पंढरीतील महाआरोग्य शिबराचे महाराजांच्या हस्ते उद्घाटन
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-कार्तिक वारीसाठी पंढरीत येणार्या लाखो भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत,शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' हे महाआरोग्य शिबीर भरवण्यात आले आहे. बुधवारी ६५ एकर येथे महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहीनीनाथ महाराज औसेकर, हभप जयवंत महाराज बोधले, शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, भैरवनाथ शुगर्सचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, यांच्यासह जिल्हा व तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर यांच्या उपस्थित या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत म्हणाले कि, ज्या पध्दतीने आषाढी सोहळ्यामध्ये सुविधायुक्त आरोग्य शिबीर राबवण्यात आले होते. त्याच धर्तीवर हे आरोग्य शिबीर राबवण्यात आले आहे. यामध्ये विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार असून सर्वच आरोग्य तपासण्यांचा यामध्ये समावेश आहे.भाविकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा. यंदाही लाखो भाविकांची आरोग्य तपासणी करण्याचा आमचा मानस आहे. असे त्यांनी सांगितले.तसेच मंदिर समितीचे गहीनीनाथ महाराज औसेकर, हभप जयवंत महाराज बोधले, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून या आयोजीत करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचे महत्व सांगुन वारकर्यांना आरोग्य शिबीराबाबत माहिती दिली. तसेच सावंत बंधू यांनी वारकर्यांच्या आरोग्य सेवेबाबत घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
0 Comments