Hot Posts

6/recent/ticker-posts

आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे यश

 आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे यश



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-अक्कलकोट येथे झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी चा हनुमंत संभाजी अनपट याने 200 मी. धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक व 100 मी. धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला आणि प्रथमेश धनंजय नलवडे याने थाळीफेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला त्याबद्दल विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार बबनरावजी शिंदे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणितसिंह भैय्या शिंदे, विक्रमसिंह दादा शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ रवींद्र कुनाळे यांचे मार्गदर्शन लाभले..


Reactions

Post a Comment

0 Comments