Hot Posts

6/recent/ticker-posts

विकसित भारत संकल्प यात्रा : शासन आणि लाभार्थींमधील सुसंवाद होणार आणखी दृढ

 विकसित भारत संकल्प यात्रा : शासन आणि लाभार्थींमधील सुसंवाद होणार आणखी दृढ



 भारत (कटूसत्य वृत्त):- सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचावेत, या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल-मे-२०१८ या कालावधीत 'ग्राम स्वराज अभियान' तसेच माहे जून-ऑगस्ट-२०१८ या कालावधीत 'विस्तारीत ग्राम स्वराज अभियान' राबविले होते. अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, 'विकसित भारत संकल्प यात्रा' या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून दि. १५ नोव्हेंबर, २०२३ ते दि. २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत आखण्यात आली आहे. या विषयीचा शासन निर्णय शासनाने दि. 08 नोव्हेंबर 2023 रोजी प्रकाशित केला असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे, त्याचा संकेतांक २०२३११०८१५३४४०५०१६ असा आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments