युवकांनो सेंट्रल ह्युमन राईट संघटन मध्ये सामील व्हा...!
जिल्हाध्यक्ष श्रेयस पाटील यांचे आवाहन...!!
सुवर्णसंधीचा लाभ घ्या....!!!
सोलापूर (कटू सत्य वृत्त): - सेंट्रल ह्युमन राइट संघटन (CHRS) दिल्ली हे संघटन 2016 पासून महाराष्ट्र आणि देशात कार्यरत असून आजवर या संघटनच्या माध्यमातून विविध प्रश्नांना न्याय देण्याचे काम अव्याहतपणे सुरू असून सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर काम करण्याची ज्यांच्यामध्ये धमक आणि तीव्र इच्छा आहे अशा तरुणांनी या संघटन मध्ये सहभागी व्हावे . काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्रेयस पाटील यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.पुढे बोलताना पाटील म्हणाले की, " गेल्या सात-आठ वर्षांपासून हे संघटन घटना दर अधिकार मूलभूत अधिकार मानवाधिकार या संविधानिक मूल्याच्या अनुषंगाने काम करत आहे.संघटित कामगार ,महिला ,अस्पृश्य मुले, वयोवृद्ध शेतकरी, कष्टकरी, आणि नाही रे वर्गाच्या अधिकाराबाबत सर्व पदाधिकारी व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कुमार लोंढे नॅशनल कोर कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम आणि प्रचंड कार्य सुरू आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जिल्हाध्यक्ष श्रेयस पाटील आणि शहराध्यक्ष बंटी पवार यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात वाडी वस्तीवर संघटन पोचवण्यासाठी सर्वसामान्य प्रश्नावर काम करण्याची गरज आहे त्यासाठीच सर्वसामान्य प्रश्नावर काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन सेंट्रल हुमान राईट संघटन दिल्ली यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रेयश पाटील यांनी केलं आहे.
या संघटनच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांना वाचा फोडण्यात आली.
* मराठा, धनगर, आणि मुस्लिम समाजास ओबीसी आरक्षणास धक्का न लागता आरक्षण देण्यात यावे.
* देशातील व राज्यातील स्वतंत्र संस्था बळकट केल्या तरच संविधानिक मूल्यास अर्थ आहे. उदा. बार्टी, सारथी, महा ज्योती, या संस्थेमधील सरकारच्या हस्तक्षेपामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
* राज्यात व देशात एकच शिक्षण प्रणाली असावी. सर्वांना समान गणवेश व समान शिक्षण असावे.
* दलित बजेटचा कायदा करावा.
* जिल्हा मध्यवर्ती बँक डुबवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी.
* बालवाडी ते पदवीधर शिक्षण केजी ते पीजी सर्वांना मोफत असावे.
* सोलापूर सिव्हिल मधील सिटीस्कॅन मशीन साठी पालकमंत्र्यांनी विशेष निधी ची तात्काळ तरतूद करावी.
* बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी सर्व महामंडळे, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग इत्यादी कर्ज प्रकरणे करणे कामी बँकांना शासनाने आदेश द्यावेत.
* भूमिहीन व्यक्तींना प्रत्येक कुटुंबास दोन एकर जमीन मिळावी.
* धर्मादाय हॉस्पिटल हे गरीब व निर्धन रुग्णास मोफत उपचार नाकारतात. हे गंभीर आहे धर्मादाय आयुक्त यांनी या प्रकरणी विशेष लक्ष द्यावे.
* मानवाधिकाराची गळचेपी करणाऱ्या विरुद्ध तक्रार न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी.
* एकीकडे आरक्षण देतो म्हणायचे व दुसरीकडे खाजगीकरणाचा नारा वाजवायचा ही दुटप्पी भूमिका सरकारची नसावी.
* खाजगी संस्थांमध्ये अनु जाती इ.
मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी.
* राज्यातील शिक्षक , असंघटित कामगार, कंत्राटी तत्वावरील कामगार यांचे स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे.
अशा विविध सामाजिक प्रश्नांवर आणि सरकारला धारेवर धरणारी ही एकमेव संघटना असून विविध मागण्यांवर काम करण्याचा संघटनचा देशव्यापी प्रयत्न असल्यामुळे यापुढे जनतेसमोरील अडीअडचणींना सामोरे जाऊन त्यांना न्याय देण्याचे काम राज्यामध्ये सुरू करणार असल्याचे यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रेयश पाटील यांनी सांगितले.
0 Comments