Hot Posts

6/recent/ticker-posts

कै. शाहीर रामहरी सिद्राम भोसले मास्तर कलारत्न पुरस्काराचे 19 नोव्हेंबर रोजी आयोजन....!

 कै. शाहीर  रामहरी सिद्राम भोसले मास्तर कलारत्न पुरस्काराचे 19 नोव्हेंबर रोजी आयोजन....! 

हिराचंद नेमचंद वाचनालयात होणार सोहळा.....!!

विनोद भोसले आणि

रवींद्र भोसले यांची माहिती....!!!


सोलापूर (कटूसत्य वृत्त): - सोलापूर हुतात्मा नगरीत लोकसंगीताच्या व्यासपीठावर आपल्या उत्तुंग कलेचा अजरामर ठसा उमटवणारे लोकगायक कै. शाहीर रामहरी सिद्राम भोसले (मास्तर) यांच्या 23 व्या पुण्यतिथी चे औचित्य साधून दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय मध्ये कलारत्न पुरस्काराचे आयोजन सुरसंगीत कलाकार चॅरिटेबल ट्रस्ट आणि कै. शाहीर रामहरी सिद्राम भोसले परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असल्याची माहिती विनोद भोसले आणि रवींद्र भोसले यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना विनोद भोसले म्हणाले की, " सोलापूर शहरांमध्ये दिनांक 2 /8 /1955 रोजी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या म्हणजेच कै. सिद्राम तुकाराम भोसले ( पाटील) यांच्या पोटी शाहीर रामहरी भोसले यांचा जन्म झाला.
बालपणापासूनच म्हणजेच वयाच्या 12 व्या वर्षापासून बँजो बासरी आणि हार्मोनियम गायनास रामहरी यांनी सुरुवात केली. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षापासून गीत लेखनाला सुरुवात केली. त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेत त्यांचे कार्यक्रम जनजागृती, व्यसनमुक्ती, कुटुंब कल्याण, शाहीर पोवाडा, लोकगीत, भावगीत, गवळण, लावणी, कवण, बतावणी, देवीचे गीत यापैकी अनेक गीते आपल्या शाहिराच्या लेखणीतून राज्यातील अनेक कलावंतांनी महाराष्ट्रभर गायली.

त्यापैकी चमके शिवबाची तलवार, बोबडी गवळण, नको मारु रे कान्हा पिचकारी, अहो सखिया अहो बोला अहो बोला ना का बोला, अशी अनेक गीते आजही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र सरकारने शाहिरांच्या कलेला प्रतिसाद देत बालाजी कलापथक व व्यंकटेश लोकनाट्य कलापथक असे दोन कलापथक तयार केले होते. एवढेच नव्हे तर भारत सरकारने 1990 साली दिल्ली येथील लाल किल्ल्यावर शाहिरांना गायनाची संधी दिली आणि सोलापूरचे नाव देशाच्या राजधानी पर्यंत पोहोचवले. दिल्ली या ठिकाणी अफजलखानाचा वध हा पोवाडा हिंदी मधून अतिशय बहारदार आणि पहाडी आवाजात गायन केल्यामुळे माजी राष्ट्रपती कै. के नारायण यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. शाहीर कै.रामहरी भोसले यांनी विठ्ठल उमप , प्रल्हाद शिंदे ,चंद्रकांत काळे, अरुण सरनाईक केशवराव बडगे सुरेखा पुणेकर संदीप शिंदे मरहूम अब्दुल सत्तार मुर्शद ( निजामी कवाल) बजरंग भोसले, दत्ता बाबरे, ज्ञानेश्वर माऊली अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम सूर संगीत कलाकार चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर आणि कै. शाहीर रामहरी सिद्राम भोसले मास्तर परिवार व सर्व जाती-धर्मातील कलाकार एकत्र येऊन करताहेत. पुरोगामी महाराष्ट्रातील हा एकमेव रंगमंच असल्याचे असल्याचे यावेळी रवींद्र भोसले यांनी अभिमानाने सांगितले. फिल्म अभिनेता अली खान, सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, गीतकार चंदन आदिनाथ कांबळे, सुप्रसिद्ध शाहीर, गीतकार, संगीतकार शाहीर रामानंद आप्पासाहेब उगले, महाराष्ट्र पुरस्कार विजेता चैतन्य देवढे ( माऊली), छोटे उस्ताद फेम कु. प्रांजल बोधक हे यंदाचे कलारत्न पुरस्काराचे मानकरी आहेत.

सुरसंगीत कलाकार चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर तर्फे कला उत्कर्ष पुरस्काराचे मानकरी म्हणून सुप्रसिद्ध सुंन्द्री वादक भारत सरकार भीमण्णा जाधव, आणि सुप्रसिद्ध गायक शेरखान यांची निवड झाली आहे.
या कार्यक्रमा मध्ये स्टार ऑफ मे लेडीज कलाकार ग्रुप व जब्बार अँड धनंजय प्रस्तुत सर्व कलाकार यांचा सत्कार सोलापुरातील ज्येष्ठ संगीतकार व गायक, वादक यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे माहिती यावेळी बोलताना विनोद भोसले यांनी शेवटी दिली.

या पत्रकार परिषदेला रवींद्र रामहरी भोसले, डॉ. जब्बार मुर्शद, फिल्म डायरेक्टर मुंबई एजाज अहमद शेख, विनोद भोसले आणि सचिन भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक म्हणून भोसले परिवार परिश्रम घेत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments