Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर सिंहगडच्या प्रा.राहुल होनकळस यांना 'सीड मनी' मंजूर

 सोलापूर सिंहगडच्या प्रा.राहुल होनकळस यांना 'सीड मनी' मंजूर




सोलापूर (कटुसत्य प्रतिनिधी):  सिंहगड महाविद्यालयाकडून मागील वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून संशोधनास अर्थसाहाय्य देण्यासाठी सीड मनी या योजनेंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले होते. यामध्ये एन. बी. एन. सिंहगड अभियांञिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील प्रा.राहुल राजन होनकळस यांनी प्रस्ताव दाखल केला होता. सदर प्रस्ताव विद्यापीठाकडून निवड करण्यात आला असून प्रा. राहुल राजन होनकळस यांना ७४ हजार रुपये संशोधन निधी मिळणार आहे. यामुळे महाविद्यालयातील संशोधनास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. प्रा.राहुल राजन होनकळस  यांनी मेकॅनिकल विषयाशी  निगडित असलेल्या परफॉर्मन्स अनॅलसिस ऑफ स्मॉल स्केइल् कंपोझिट टनेल सोलार ड्रायर या विषयावर प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास विद्यापीठाने मान्यता दिली असुन संशोधनासाठी अनुदान मिळणार आहे.
 
या  संशोधनासाठी निधी प्राप्त होत असल्याने महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण होत आहे. भविष्यात जास्तीत-जास्त संशोधन निधी उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्रयत्न करीत आहेत.
या संशोधन निधीचा फायदा एन बी एन सिंहगड अभियांत्रिकी  महाविद्यालयातील प्राध्यापक व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून निधी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे संस्थेचे सहसचिव संजय नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उप-प्राचार्य डॉ. आर. टी. व्यवहारे व डॉ. एस. एम. जगदे  सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments