शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने (वर्ष 15 वे) आज भव्य रक्तदान
शिबीर संघटनेच्या 15 व्या रक्तदान शिबिरानिमित्त सर्व रक्तदात्यांचा
सन्मान करणार :-अशोक कामटे संघटना
सांगोला (कटूसत्य वृत्त):-शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने 26/11 संविधान दिनाचे औचित्य साधून ,26/11/2008 रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ तसेच सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त स्व.अशोकजी कामटे यांच्या 15 व्या पुतण्यतिथीनिमित्त सांगोल्यात आज रविवार दि.26/11/2023 रोजी स्टेशन रोड विटा बँकेसमोर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे .
तसेच कारगिल युद्धातील जवान ,माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, वीर माता-पिता यांचा सन्मान, सर्व रक्तदात्यांचा सन्मान करून गौरव करणार आहे. भव्य किल्ले स्पर्धा 2023 बक्षीस वितरण व शहिदांना श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने अनेक समाजसेवक मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमास सर्व शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहुन शहिदांना आदरांजली अर्पण करावी असे आव्हान शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments