एस व्ही सी एस प्रशालेची राज्य पुरस्कारासाठी निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या शिक्षण विभागाचा स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिल्या टप्प्यामध्ये प्रभावी कामगिरी केल्यामुळे एस व्ही सी एस हायस्कूल एमआयडीसी या शाळेची राज्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे . या प्रकल्पाचा पहिला टप्पा दोन ऑक्टोबर रोजी संपन्न झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदींचा हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता यामध्ये राज्यातील 64 हजार शाळा सहभागी झाले आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नोंदणीकृत 64 हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी शंभर शाळांचे कौतुक आणि सत्कार मुंबई येथे केले जाणार आहे. त्याचबरोबर निवडक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर ने गौरविण्यात येणार आहे त्यामध्ये पहिल्या शंभरच्या यादीत एस व्ही सी एस ने बाजी मारली आहे यापूर्वीही स्वच्छतेचे अनेक पुरस्कार या शाळेला प्राप्त झालेले आहेत. राज्य प्रकल्प संचालक रोहित आर्या व्यवस्थापक सागर याळवाद शिक्षण विस्तार अधिकारी गोदावरी राठोड स्वाती स्वाती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागोजागी बेफिकीर लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले. शाळा समन्वयक तथा उपमुख्याध्यापक गिरमल बुगडे, पर्यवेक्षक विलास म्हमाणे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यासोबत नेहमी चर्चा करून त्यांचा अनुभव ऐकून मार्गदर्शन देत राहिले त्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, संस्थेचे सचिव शांतया स्वामी संचालक शशिकांत रामपुरे व पालक वर्ग यांनी शाळेचे अभिनंदन केले.
0 Comments