दक्षिण सोलापूर प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने "आचार्य दादासाहेब दोंदे
गुणवंत शिक्षक "पुरस्काराचे शानदार वितरण....!
मारुती मंगल कार्यालय सैफुल या ठिकाणी या ठिकाणी पार पडला पुरस्कार
वितरण समारंभ....!!
अध्यक्ष महिबूबसाब सवार यांची माहिती. ....!
सोलापूर ( कटू सत्य वृत्त): -शिक्षण हे वाघिणीचं दूध असून शिक्षणाची गंगा वाडी वस्तीवर पोहोचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याच्या भूमिकेतून दक्षिण सोलापूर प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडीच्या वतीने आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक, आदर्श शाळा व्यवस्थापन समिती पुरस्कार, आणि विद्यार्थी चित्रकला रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले आणि विविध मान्यवरांच्या यांच्या शुभहस्ते मारुती मंगल कार्यालय सैफुल या ठिकाणी सरदार वातावरणात संपन्न झाल्याची माहिती माहिती शिक्षक संघाचे अध्यक्ष महिबूब साब सवार यांनी दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सवार म्हणाले की, " दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गेल्या अकरा वर्षापासून पुरस्कार वितरण सोहळा शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी घेण्यात येत असून यंदाचे पुरस्काराचे हे अकरावे वर्ष असून हा पुरस्कार वितरण समारंभ जुळे सोलापुरातील मारुती मंगल कार्यालय येथे संपन्न झाला असून जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या शुभहस्ते आणि राज्य संघाचे जेष्ठ सल्लागार बाळासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ दुपारी दोन वाजता संपन्न झाला. याच कार्यक्रमा च्या निमित्ताने दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी महिला आघाडीच्या वतीने घेतलेल्या रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुद्धा करण्यात आलं.
या भव्य दिव्य पुरस्कार वितरण समारंभासाठी दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, अमर पाटील, उत्तमराव जमदाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सरस्वती भालके, सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड, ज्येष्ठ शिक्षक नेते शिवानंद भरले, संचालक शिवाजी पाटील, मंद्रूप पतसंस्थेचे अध्यक्ष राजकुमार बिज्जरगी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे 13 शिक्षकांना आणि अक्कलकोट तालुक्यातील दोन, उत्तर सोलापूर तालुक्यातील एक, एक उर्दू आणि एक कन्नड अशा 18 शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी अनिता मरगूर, श्रीशैल बिराजदार, निजगुण बनगोंडे, विजयालक्ष्मी पाटील ,लक्ष्मण बन्ने, नितीन कुलकर्णी, गीता वाघमोडे, जमेला महमद इसाक तांबोळी, श्रीमंत कोळी, चंद्रकांत पाटील, शकुंतला बंदी छोडे, आशा कोळी, नीलम महाजन, सरिता पाटील, बेबी इंगळे, श्रीशैल समदुर्ले, परमेश्वर हराळे आणि गुलनाज रहिमान मकानदार आदी शिक्षकांना गौरविण्यात आले .शेखर नागणसूरे आणि देविदास वाघमोडे यांनाही आदर्श विस्तार अधिकारी आणि आदर्श केंद्रप्रमुख म्हणून गौरविण्यात आले. याचवेळी विडी घरकुल, विंचूर, आहेरवाडी ,आणि वळसंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला असून चार गुणवंत कर्मचाऱ्यांना सुद्धा याप्रसंगी सन्मानित करण्यात आल्याची असल्याची माहिती अध्यक्ष महिबूबसाब सतार यांनी शेवटी दिली.
या पत्रकार परिषदेस मल्लिनाथ पुजारी, भिमराव पाटील, शिवाजी पाटील, दयानंद वठारे ,सिद्राम कटगेरी, राजकुमार बिज्जरगी, बालाजी गुरव, विद्याताई जगताप, अपेक्षा रणदिवे, वैशाली हडलगी, नजमुन्निसा मुजावर आदी उपस्थित होते.

0 Comments