ग्रामदैवत श्री माढेश्वरी देवीच्या चार दिवसीय यात्रोत्सवाला आज पासून सुरुवात
माढा (कटूसत्य वृत्त):-माढयाचे ग्रामदैवत श्री.माढेश्वरी देवीच्या चार दिवसीय यात्रोत्सवाला शनिवार दि.२८ ऑक्टोबर पासून सुरूवात होत असुन या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माढेश्वरी जगदंबा यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष माजी आ.अॅड.धनाजीराव साठे यांनी दिली.देवीचा छबिना उत्सव यंदा ग्रहण आल्यामुळे शनिवारी सायंकाळी ११ वाजता निघणार आहे.यात्रेबाबत अॅड.साठे म्हणाले की, माढेश्वरी देवीची यात्रा चार दिवस भरणार आहे.शनिवारी (ता. २८) रात्री माढेश्वरी देवीचा मुख्य छबिना उत्सव सायंकाळी ११ वाजता निघणार आहे.रविवारी (ता.२९) पारंपारिक पद्धतीने कलगीतुऱ्याचा कार्यक्रम होणार आहे.सोमवारी (ता.३०) कुस्त्यांचा जंगी मैदान भरणार आहे.बुधवार १ नोव्हेंबरला राधा पाटील मुंबईकर यांचा लावण्यांचा कार्यक्रम आहे.त्यामुळे यंदाचा यात्रा उत्सव चार दिवसांचा असून मंगळवार बाजार चा दिवस असल्यामुळे यात्रा प्रत्यक्ष पाच दिवस भरणार आहे.यात्रेची तयारी यात्रा पंच कमिटीने पूर्ण केली आहे.माढेश्वरी मंदिराचे मुख्य शिखर,होम हवन शिखर व गोपूरावर तसेच मंदिराच्या तटबंदीवर व मंदिर परिसरात असणाऱ्या छोट्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई यात्रा पंच कमिटीने केली आहे.माढेश्वरी देवीच्या छबिना उत्सव व इतर धार्मिक विधीची तयारी पूर्ण झाल्याचे माढेश्वरीदेवी मंदिर ट्रस्टचे अॅड. उदय पुजारी यांनी सांगितले.दरम्यान माढेश्वरी देवीच्या छबिना उत्सवात नाचवण्यात येणाऱ्या मानाच्या वाहनांना सजवण्याचे काम माढा पंचक्रोशीतील विविध गावातील मानकरी सध्या करीत आहेत.माढेश्वरी मंदिराच्या परिसरात खेळण्यांची दुकाने, विविध स्टॉल,हॉटेल,पाळणे व इतर साहित्यांची दुकाने दाखल झाली आहेत.यात्रेत येणाऱ्या स्टाॅल धारकांना खेळणी,पाळणा चालकांकडून कसलीही यात्रा पंच कमिटी कडुन वर्गणी घेतली जात नाही.यावेळी दादासाहेब साठे,नगराध्यक्षा अॅड मिनल साठे यांचेसह नगरपंचायत चे नगरसेवक,यात्रा पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
छबिना उत्सवात मानाची वाहने १ वाजे च्या आत मंदिराच्या बाहेर आणण्याचे आवाहन-यंदा यात्रा कालावधीत ग्रहण आल्या मुळे छबिना उत्सव शनिवारी सायंकाळी ११ वाजता निघेल.देवीची सर्व मानाची वाहने पहाटे १ वाजण्याच्या आत मंदिराच्या बाहेर काढण्याचे आवाहन यात्रा पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments