बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी जोरदार मांगणी.
मुंबई(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 25 ऑक्टोबर रोजी मुंबई बांद्रा येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.त्यात सांगली जिल्हातील बांधकाम कामगारांनी आंबेडकरी चळवळीतील जीवदानी कार्यकर्ते मान.धनंजय शिवाजी वाघमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अध्यक्ष आटपाटी तालुका,निवारा बांधकाम कामगार संघटना जिल्हा नेते यांनी बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळण्याबाबत धरणे आंदोलनात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.यावेळी बांधकाम कामगार संघटना कृती समिती मुख्य निमंत्रक कॉम्रेड शंकर पुजारी,मुख्य संघटक आयु सागर तायडे,साथी विनिता बाळेकुंद्री,सुरेश पाटील आणि विविध जिल्ह्यातील कामगार,कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.धनंजय शिवाजी वाघमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अध्यक्ष आटपाटी तालुका,निवारा बांधकाम कामगार संघटना जिल्हा नेते यांनी बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळण्याबाबत मा.सहाय्यक कामगार आयुक्त सांगली जिल्हा,मान.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना निवेदन दिले आहे.सागर तायडे यांसकडून
0 Comments