Hot Posts

6/recent/ticker-posts

सोयाबीन, मका व बाजरी पीकांसाठी सर्व पात्र विमाधारक शेतक-यांना 25 टक्के नुकसान भरपाई रक्कम मिळणार

 सोयाबीनमका व बाजरी पीकांसाठी सर्व पात्र विमाधारक शेतक-यांना

25 टक्के नुकसान भरपाई रक्कम मिळणार


 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्याला यशविमा



 कंपनीकडून


 सोयाबीनबाजरी व मका पिकाचे अग्रीम मंजूर




ओरिएंटल विमा कंपनी सोबत पिक विमा मंजूर करण्यासाठी सात



 बैठकातर



 कृषी आयुक्तकृषी सचिवकृषी मंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा





 

            सोलापूर(कटूसत्य वृत्त):-प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पीकविमा कंपनीमार्फत सोयाबीनमका व बाजरी पीकांसाठी सर्व पात्र विमाधारक शेतक-यांना 25 टक्के नुकसान भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापासून वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली आहे.


                 प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत सोलापूर जिल्हयात माहे ऑगस्टमध्ये पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता लक्षात घेता. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील 92 महसूल मंडळे व 8 तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देणेबाबत पिक विमा कंपनीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सुचना केल्या मात्र याबाबत पिक विमा कंपनी मार्फत निर्णय घेण्यात येत नव्हता.


                 प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत   अंतर्गत सर्व विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देणे बाबत पिक विमा कंपनीस वेळोवेळी जिल्हास्तरीय बैठकांमध्ये तसेच लेखी पत्राद्वारे वांरवार सूचना देऊन तसेच अपर मुख्य सचिव कृषि विभागआयुक्त कृषि महाराष्ट्र राज्य यांचेशी दुरध्वनीद्वारे तसेच कृषि मंत्री महाराष्ट्र राज्य व  पालकमंत्री सोलापूर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. त्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाठपुरावा केला. तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पिक विमा अग्रीमबाबत पाठपुरावाही केलेला होता. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी ही पीक

 विमा अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शासन व विमा कंपनीकडे पाठपुरावा करत होते.             जिल्हा प्रशासन व सर्व लोकप्रतिनिधी यांनी विमा कंपनीकडे केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन विमा कंपनीने सोयाबीन बाजरी व मका पिकासाठी आगाऊ रक्कम मंजूर केली. जिल्ह्यात पीकविमा कंपनीमार्फत सोयाबीनमका व बाजरी पीकांसाठी सर्व पात्र विमाधारक शेतक-यांना 25 टक्के अगाऊ रक्कम देण्यात येणार असून पीकविमा कंपनीमार्फत 25 टक्के नुकसान भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापासून विमाधारक शेतक-यांना वितरीत करण्यात येणार आहे. तसेच अधिसूचनेमधील उर्वरित पीकांसाठी शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्याच्या अनुषंगाने विमा कंपनीकडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सातत्याने पाठपुरावा करत असून लवकरच उर्वरित पिकांसाठीही विमा कंपनी आगाऊ रक्कम मंजूर करेल अशी माहिती गावसाने यांनी दिली.


Reactions

Post a Comment

0 Comments