भोगाव फुट रस्त्यावरील कालव्यात पडलेल्या युवकाचा
जीव वाचविल्याबद्दल, उत्तर सोलापूर तालुका शिवसेना पक्ष व
ग्रामपंचायत गुळवंचीच्या वतीने संजय खरटमल यांचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मागील आठवड्यात जेष्ठा गौरीच्या आगमना दिवशी,भोगाव फुट रस्त्यावरील सुमारे तीस ते चाळीस फूट खोलीच्या कालव्यात (कॅनॉल मध्ये) पडलेल्या,बाळे येथील अंबिका नगर मध्ये राहणाऱ्या अशोक विक्रम साळुंखे या युवकाचे,स्वताच्या जीवाची पर्वा न करता धाडसाने, आपल्या युक्तीच्या साह्याने दोरखंड द्वारे रेस्क्यु ऑपरेशन करून,सामाजिक कार्यकर्ते संजय खरटमल यांनी,त्या अंधारात चाचपडत पडलेल्या युवकाचा जीव वाचविल्याबद्दल,उत्तर सोलापूर तालुका,शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांची समक्ष भेट घेवून,सामाजिक कार्यकर्ते संजय खरटमल यांचा,आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात यावा,अशी मागणी करणार असल्याचे प्रतिपादन,उत्तर सोलापूर तालुका,शिवसेना (उ.बा.ठा.)पक्षाचे तालुकाप्रमुख संजय पौळ यांनी केले.*
*ते उत्तर सोलापूर तालुका, शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या व ग्रामपंचायत गुळवंची व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या सामाजिक कार्यकर्ते संजय खरटमल यांच्या सत्कार प्रसंगी गुळवंची येथील कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल, सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत असणारे श्री मंगरुळे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.* *यावेळी गुळवंची च्या सरपंच तृप्ती संजय पौळ,जेष्ठ शिवसैनिक दादासाहेब काशीद,कारंबा येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय समितीचे अध्यक्ष संजय आदाटे,शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्रीकांत आदाटे,गुळवंचीचे माजी सरपंच अनिल तांबे,विकास मुगळे,सागर बोराडे,संजय गवळी,मधुकर आयवळे, अमोल बोराडे,आरकेश बोराडे आदी मान्यवरांसह बहुसंख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब काशीद यांनी केले तर, उपस्थितांचे आभार शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पौळ यांनी मानले.

0 Comments