Hot Posts

6/recent/ticker-posts

सिने नाट्यकलाकार रसिका आगाशे कडून विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक मदत

 सिने नाट्यकलाकार रसिका आगाशे कडून विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक मदत


अकलूज (कटूसत्य वृत्त):- स्व.कल्पना शामराव भाले(मधुरा अनिल आगाशे )यांचे स्मरणार्थ प्रसिद्ध सिने, नाट्य कलाकार लेखिका ,दिग्दर्शिका रसिका आगाशे यांनी येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथील हुशार व गरजू विद्यार्थिनी प्रीती रास्ते, गौरी कुंभार, श्रुती उबाळे, वैष्णवी कुरुडकर, यांना प्रत्येकी तीन हजार रुपये रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली.

कै.कल्पना भाले त्यांच्या आई असून त्या  सदर प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या मुलांचे शिक्षण आणि त्यांचा सर्वांगीण विकास यावर कायम भर दिला.आर्थिक अभावामुळे कोणाचे शिक्षण अपूर्ण राहू नये ही त्यांची इच्छा होती.म्हणून त्यांचे स्मरणार्थ रसिका दरवर्षी काही रक्कम गरजू विद्यार्थ्यांना मदत करू इच्छितात.सदर रक्कम प्रदान करताना प्रशालेचे प्राचार्य प्रकाश चवरे,उपप्राचार्य कलाप्पा बिराजदार, पर्यवेक्षक रितेश पांढरे,रश्मी ढोक,सहशिक्षक सुनील जवरे,बाळासाहेब भोसले,संजय बांदल,सहशिक्षिका सविता क्षीरसागर,रजनी चौरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments