Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू जोमात, जिल्हा प्रशासन कोमात

 सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू जोमात, जिल्हा प्रशासन कोमात


सोलापूर (दादासाहेब निळ):- सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढत असलेल्या बांधकामाला वाळूची गरज असल्यामुळे आणि हीच गरज ओळखून सोलापूर जिल्ह्यात तीन नदीच्या पात्राच्या जवळ काही वाळूमाफियांनी अवैध वाळू चोरीचा धंदा जोमात सुरू केल्याचे दिसत आहे.  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे या अवैध वाळू माफियांना कदापी आशीर्वाद देणार नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.  सोलापूर जिल्ह्यात वाळूचे डेपो तयार करून सर्वांना वाळू पुरवठा करण्याचे शासनाचे धोरण कागदावरच राहिलं असून भरारी पथके सुद्धा नाममात्र नेमली होती की काय ...?असा प्रश्न  सध्या नागरिकांमधून विचारला जात आहे.  सर्वसामान्य नागरिकाला स्वस्त दरामध्ये वाळू मिळावी या हेतूने सरकारच्या वतीने नवे वाळू धोरण निर्माण करण्यात आले होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे जिल्ह्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर नेमलेली भरारी पथके सुद्धा चिरीमिरी खाऊन गप्प बसली की काय असा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे.  रीतसर आणि शासनाच्या नियमानुसार वाळू मिळत नसल्यामुळे नागरिक अवैध वाळू विकणाऱ्या वाळू माफियाशी संपर्क साधतात आणि त्यानंतर हे वाळूमाफिया बकरा कापल्याप्रमाणे वाळूचा दर स्वतः ठरवून नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक करत असल्याचे वास्तव आहे.  प्रशासनाच्या या भोंगळ कारभारा विषयी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय.  नव्या शासकीय धोरणानुसार जिल्ह्यामध्ये जवळपास सहा ते सात ठिकाणी वाळू डेपो सुरू करण्यात आले आणि लिलाव सुद्धा करण्यात आला परंतु त्यानंतरच्या काळात पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष न दिल्यामुळे हे वाळू डेपो सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचे डेपो बनले असल्याचे दिसत आहे.  कारण शासनाच्या दरानुसार गरिबांना वाळू मिळत नाही आणि अवैध वाळू उपशावर प्रतिबंध शासनाला करता येत नाही.  त्यामुळे नेमलेली भरारी पथक नेमकं करतात तरी काय ...?का..?  ती नावालाच नेमली आहेत.  असा प्रश्न सध्या निर्माण झाला  आहे. सध्या ग्रामीण भागामध्ये वाळू माफिया यांनी सर्व प्रशासनाला हाताशी धरून आपली तुंबडी भरून घेण्याचा उद्योग सुरूच ठेवला असून तलाठी बीट हवलदार आणि अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांमध्ये मिली भागात झाल्याचे दिसत असल्यामुळे जिल्ह्यात अवैध वाळू चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे.  अधिकारी वर्ग फक्त तक्रारी आल्यानंतरच लक्ष देतात इतर वेळी मात्र अशा अवैध वाळू उपसा करणाऱ्या समाजकंटकांना एक प्रकारे आशीर्वादच देत असल्याचे आजवर दिसून आल्यामुळे रीतसर वाळू मिळवण्यासाठी मात्र सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणीला तोंड द्यावे लागत आहे हे मात्र निश्चित...!
Reactions

Post a Comment

0 Comments