Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर जिल्ह्यात डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ

 सोलापूर शहर जिल्ह्यात डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये विशेषता ग्रामीण भागामध्ये सुद्धा मागच्या आठवड्यात मोठा पाऊस झाल्यानंतर साथीच्या आजाराचे प्रमाण वाढलेलं आहे. या आजाराच्या खांद्याला खांदा लावून पुन्हा एकदा डेंग्यू,  मलेरिया,  आणि चिकुन गुनिया या रुग्णांचे ही प्रमाण वाढू लागलेले आहे.  महापालिकेतर्फे फवारणी सुरू असून ग्रामीण भागामध्ये सध्या मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.  असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने फवारणी धुराळणी आणि विविध ठिकाणी नागरिकांसाठी जनजागृती सुद्धा करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.  सोलापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा प्रदीर्घ रजा घेतल्यानंतर साथीच्या आजाराने डोके वर काढले असून उपचार घेऊन सर्व रुग्ण व्यवस्थित घरी परतत असल्यामुळे आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान शहरात आणि ग्रामीण भागातील आरोग्य विभाग यंत्रणा सतर्क झाले असून सर्वत्र नागरिकांना उपचार करण्याचे आवाहन करण्यात येत असून ताप थंडी आल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे. आपल्या घरासमोर घाण पाणी साचू देऊ नका.  असे आव्हान सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments