सावळेश्वर तालुका मोहोळ येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने साखळी
उपोषणाच्या दरम्यान मराठा बांधवांनी मुंडन आंदोलन करून सरकारचा
निषेध केला.
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील सावळेश्वर येथे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करून त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण आयोजित करण्यात आले असून यामध्ये आज शेकडो मराठा समाज बांधवांनी मुंडन आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
या मुंडन आंदोलन मध्ये रवी पाटील, सागर अंबुरे, विकास जाधव, संतोष साठे ,अजिनाथ अंबुरे ,सोमा नागणे, रामचंद्र पवार, प्रमोद कदम, प्रवीण नागणे ,ज्ञानेश्वर पवार ,गौरव हांडे, महादेव नीळ, महेश सुरवसे, धोंडीबा नीळ, तायप्पा निळ, यशवंत आंबुरे, किसन नागणे अदीसह बहुसंख्य मराठा बांधवांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
या साखळी उपोषणामध्ये मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या अंतरवाली सराटी येथील भव्य आणि दिव्य विराट सभेसाठी जाणाऱ्या मराठा बांधवांना सभेला शांततेत जाण्याचे आणि घरी येण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
0 Comments