Hot Posts

6/recent/ticker-posts

सफाई मित्रांसाठी लोन मेळाव्याचे आयोजन

 सफाई मित्रांसाठी लोन मेळाव्याचे आयोजन

       
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली -उगले व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली “सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज २०२४” व शासन निर्णया नुसार “ हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनिमय, २०१३ च्या अंमलबजावणी करणे कामी National Safai Karamcharis Finance & Development Corporation (NSKFDC) यांच्या कडील विविध सफाई मित्रासाठी असणाऱ्या योजनाची माहिती व प्रसार सोलापूर महानगरपालिके कडील सफाई मित्र यांना होणे कामी
 १) सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
२) National Safai Karamcharis Finance & Development Corporation (NSKFDC), नवी दिल्ली
३) समाज कल्याण विभाग व "महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित", सोलापूर
४) जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर
५) जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर,
    तसेच इतर बँक यांच्या सर्वाच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ११/१०/२०२३ रोजी हुतात्मा स्मुर्ती मंदिर येथे लोन मेळावा चे आयोजन करण्यात आलेले होते.
   या लोन मेळाव्याचे उद्घाटन  अतिरिक्त आयुक्त निखील मोरे यांच्या हस्ते  करण्यात आले.  या वेळी उपस्थित असलेले सफाई मित्र यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारत चे कार्डचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास  उपायुक्त मच्छिंद्र  घोलप, विजयकुमार राठोड, सार्वजनिक आरोग्य अभियंता,  National Safai Karamcharis Finance & Development Corporation (NSKFDC) नवी दिल्ली यांचे प्रकल्प अधिकारी मानवी दिक्षित,  राजशेखर शिंदे – प्रकल्प अधिकारी व काफील शेख -  उद्योग  निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर , महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, सोलापूर यांचे  श्रीकांत बनसोडे,  बँक ऑफ महाराष्ट्र चे मंगेश पावसकर व वैभव घाडगे, हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना रामचंद्र पेंटर यांनी केली.

         “मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अॅक्ट २०१३” नुसार गटार आणि सेप्टिक टाक्यांची धोकादायक साफसफाई ही प्रतिबंधित करण्यात आली आहे. सेप्टिक टॅंक व भूमीगत  गटारांच्या धोकादायक स्वच्छता करताना शून्य मृत्यूची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय ( MOSJE ) आणि गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय ( MoHUA ) यांच्या मार्फत “नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम ( NAMASTE ) या नावाने संयुक्त योजना राबविण्यात येत आहेत.

         भूमिगत मलनिःसारण यंत्रणेची अथवा सेप्टिक टँकची देखभाल व दुरुस्ती करताना अथवा ते साफ करण्यासाठी सफाई कामगारास मॅनहोल (Manhole) मध्ये / नाल्यात उतरून साफ करावे लागते, अशावेळी आवश्यक ती काळजी घेतली न गेल्याने अपघातांच्या व प्रसंगी सफाई कामगारांच्या  मृत्यूच्या घटना घडतात हे टाळण्यासाठी व त्यांना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी सोलापूर महानगरपालिके कडून “स्वच्छता शीघ्रकृती दल” म्हणजेच, “Emergency Response Sanitation Unit “ (ERSU) ची स्थापना करण्यात आलेली आहे. “स्वच्छता शीघ्रकृती दल” (ERSU) करिता “१४४२०”  स्वतंत्र टोल फ्री संपर्क क्रमांक सुरु करण्यात आलेले आहे.

        या वेळी National Safai Karamcharis Finance & Development Corporation (NSKFDC) नवी दिल्ली यांचे प्रकल्प अधिकारी मानवी दिक्षित यांनी सफाई मित्रा साठी खालील योजना बाबत सर्व सफाई कर्मचारी व त्याच्या वर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती करीता असल्याचे मेळवा मध्ये सांगितले. या मेळाव्यास आरोग्य निरीक्षक , सफाई कर्मचारी व त्याच्या वर अवलंबून असणारे व्यक्ती असे 750 जन उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments