Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महानगरपालिका व जय भारत माते सेवाभिरुद्ध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बेघर दिन साजरा

 सोलापूर महानगरपालिका व जय भारत माते सेवाभिरुद्ध संस्था यांच्या

 संयुक्त विद्यमाने जागतिक बेघर दिन साजरा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सोलापूर व जय भारत माते सेवाभिरुद्ध संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने 10 ऑक्टोंबर जागतिक बेघर दिन साजरा करण्यात आला यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा ,निबंध स्पर्धा,काव्यवाचन स्पर्धा,गीत गायन स्पर्धा, वैयक्तिक स्वच्छता आरोग्य तपासणी शिबीर, दंत तपासणी शिबीर, ध्यान  शिबीर,योगा प्राणायाम साधना शिबीर, इत्यादी कार्यक्रमाची मेजवानी आपुलकी बेघर निवारा केंद्र कुमठा नाका येथे करण्यात आली सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी मच्छिन्द्र घोलप सर यांच्या  सूचनेनुसार विविध उपक्रम राबविण्यात आले,या प्रसंगी शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी , आरोग्य निरीक्षक विठोबा सिंधीबंदी, यांच्या शुभहस्ते स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन  करण्यात आले व मान्यवरांच्या शुभ हस्ते स्पर्धेकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसगी समुदाय संघटक वसीम शेख, सत्यजित वडावराव,शशिकांत वाघमारे प्रभागातील जमादार दत्ता गायकवाड, आपुलकी बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक अशोक वाघमारे इफ्तार शेख, काळजी वाहक शक्ति जाधव, महिला काळजी वाहक सौ. दिलशाद शेख, धर्मा कांबळे उत्तम बनसोडे तसेच जय भारत माते संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशांक वळवाडे यांचे मार्गदर्शन लाभले  या प्रसंगी बेघर निवारा केंद्रातील बेघर महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.

Reactions

Post a Comment

0 Comments