Hot Posts

6/recent/ticker-posts

बोरामणीच्या विद्यार्थ्यांची विमानाने गगनभरारी

 बोरामणीच्या विद्यार्थ्यांची विमानाने गगनभरारी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिक्षण, क्रीडा क्षेत्रात नेहमी गगन भरारी घेणाऱ्या बोरामणी ता द  सोलापूर येथील बृहन्मठ होटगी संचलित  एस व्ही सी एस प्रशालेने यंदाची शैक्षणिक सहल विमानाने आयोजित करून आकाशात गगनभरारी घेतली आहे.

      प्रशालेचे मुख्याध्यापक महांतेश अतनुरे पर्यवेक्षक शिवानंद बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख अमोल कस्तुरे यांच्या नियोजनाखाली यंदाची शैक्षणिक सहल मुंबई, बेंगलोर, म्हैसूर, मडकेरी येथे जात आहे या सहली दरम्यान प्रशालेचे विद्यार्थी मुंबई ते बेंगलोर असे तीन वेगवेगळ्या विमानातून प्रवास करत आहेत त्यानुसार काल सकाळी 11:15 वाजता पहिल्या विमानात 21 विद्यार्थी व दोन शिक्षक, दुपारी ब 12.30 वाजता, दुसऱ्या विमानात 36 विद्यार्थी व तीन शिक्षक 12.55 वाजता तिसऱ्या विमानात 36 विद्यार्थी व तीन शिक्षक अशा तीन टप्प्यात विमान प्रवासाला सुरुवात झाली व 1 तास 40 मिनिटात मुंबईहून बेंगलोरला पोहोचले व सहलीचा आस्वाद घेण्यास सुरुवात झाली.

   संस्थेचे अध्यक्ष  डॉ.मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी, संस्थेचे पदाधिकारी यांनी सहली साठी शुभेच्छा दिल्या. शालेय जीवनातील व स्वतःच्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास असल्याने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी बोरामणीतील पालक मंडळी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थी व शिक्षकांना या अनोख्या सहलीसाठी शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी विमानाने सहलीचा प्रवास करत असल्याने सर्वत्र  कौतुक होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments