बाभूळगाव येथे ज्योतिबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम राम सातपुते यांची उपस्थिती
माळीनगर (कटूसत्य वृत्त):- बाबुळगाव ता माळशिरस येथील ज्योतिबा यात्रेनिमित्त गावामध्ये सोमवार दि 21 ते बुधवार दि 23 पर्यंत सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी देवाची प्रतिमा व पादुकांचा छबिना काढण्यात आला, यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, दुसऱ्या दिवशी, ह भ प लक्ष्मण महाराज राजगुरू, यांचा भारुडाचा कार्यक्रम तर तिसऱ्या दिवशी जि.प शाळेच्या भव्य पटांगणावर कुस्त्यांचे जंगी मैदान घेण्यात आले होते.
कुस्तीच्या मैदानाचे उद्घाटन मा आ राम सातपुते यांनी केले यावेळी शिवसेनेचे नामदेव वाघमारे, भाजपाचे युवा नेते विक्रम उर्फ सोनू पराडे पाटील, नागेश पराडे पाटील , शंकर पराडे बाबासाहेब पराडे ,शहाजी पराडे, पोपट सूर्यवंशी , पंजाबराव सूर्यवंशी , तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी, सुग्रीव मिटकल , भूषण पराडे पाटील,अण्णासाहेब शिंदे. संतोष राऊत.मिलिंद मोरे ,अंकुश वाघ शंकर पराडे,सत्यवान सूर्यवंशी, माणिक मिसाळ , बाळासाहेब जाधव, बाबासाहेब पराडे ,लालासाहेब गोडसे, योगेश शेंडगे, लालासाहेब पराडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
शेवटची 51 हजार मानाची कुस्ती सुरज कोकाटे विरुद्ध हर्षद दानोळे कोल्हापूर यांच्यामध्ये झाली यामध्ये सुरज कोकाटे यांनी बाजी मारली तसेच बाभुळगाव चे उत्कृष्ट विजयी मल्ल सिद्धनाथ पराडे यास बाबुळगाव मैदानाची मानाची गदा देऊन गौरव करण्यात आला या मैदानावर 100 रुपये ते 8000 हजार रुपये पर्यंत कुस्त्या जोडण्यात आल्या मैदानात महिला कुस्तीपटूंच्या कुस्त्या सर्वांचे आकर्षण ठरल्या कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी लालासाहेब पराडे ,देविदास पराडे, पांडुरंग मिटकल, चंद्रकांत पराडे ,बाबासाहेब माने- देशमुख ,धनाजी पराडे, संतोष पराडे, अमोल सूर्यवंशी, सुनील पवार यांनी विशेष परिश्रम घेतले तर कुस्ती निवेदक रामभाऊ देवकाते व प्रा.बाळासाहेब पराडे यांनी केले.
0 Comments