Hot Posts

6/recent/ticker-posts

ऑनलाइन पब्जी- गेम मध्ये तरुणाई व्यस्त, लाखो रुपये होताहेत फस्त

 ऑनलाइन पब्जी- गेम मध्ये तरुणाई व्यस्त, लाखो रुपये  होताहेत फस्त


सोलापूर (सचिन जाधव):- सध्याच्या इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान युगामध्ये pubg सारख्या ऑनलाइन गेम ची क्रेझ मोठ्या प्रमाणात तरुणाईमध्ये वाढू लागली आहे. जगाचा विचार केला तर करोडो लोक या खेळाने वेडे झाले असून भारतातून सुद्धा दहा कोटी खेळाडू या खेळाने वेडे केले असल्याचे नोंद आहे. तरुणाईच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खेळू लागल्यामुळे तोच पैसा पब्जी आणि ऑनलाईन गेम साठी वापरून देशोधडीला लागत असल्याचे चित्र देशात नव्हे तर जगात सुद्धा दिसतंय भारतामध्ये सुद्धा याची मोठी बाजारपेठ तयार झालेली आहे. या गेमची व्याप्ती शहराबरोबरच ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. 1990 च्या दशकानंतर इंटरनेटच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबरच या क्षेत्रात सुद्धा अमुलाग्र बदल झालेले आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून आजची तरुणाई या खेळामध्ये व्यस्त झालेली दिसत आहे. या pubg गेमचे लोन परदेशातून भारतात आले परंतु सध्या भारत या खेळामध्ये मोठ्या प्रमाणात गाजू लागलेला आहे. वास्तविक पाहता गेम तयार करणारे आणि विकणारी व्यावसायिक मालामाल होतात परंतु खेळणारा मात्र भिकारी बनतो हे वास्तव आहे. लाखो रुपयाचा चुराडा केल्यानंतर तरुण पुन्हा अक्षरशः भिकेने कंगाल होतो आणि त्यानंतर तो आत्महत्येकडे पाऊल उचलतो हे वास्तव आहे. या पब्जी गेम मुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन सुद्धा होऊ लागलेले आहे व्यसनांचे प्रमाण सुद्धा वाढत चाललेला आहे. सध्याच्या काळात समतोल आहार आणि पुरेशी झोप सुद्धा या खेळामुळे तरुण घेत नाहीत एवढा विळखा pubg गेमने घातलेला दिसतोय. ऑनलाइन रमी हरल्यामुळे एका तरुणाने काही महिन्यापूर्वीच आत्महत्या केल्याचे सुद्धा वर्तमानपत्रातून पाहायला मिळालं. ग्रामीण भागातील मजुरी करणारी मुले सुद्धा इंटरनेटमुळे या pubg खेळाकडे वळू लागले असून त्यांच्यावर सुद्धा आणि त्यांच्या जगण्यावर याचा मोठा प्रभाव पडू लागला आहे. या खेळामुळे तरुणाईचे भान हरपला असून प्रत्येक तरुण याकडे सेलिब्रेटी म्हणून सुरुवातीला पाहतो त्यानंतर त्यामध्ये तो बुडून जातो आणि स्वतःला संपवून टाकतो.  हे वास्तव असल्यामुळे भारत सरकारने या पब्जी गेम वर निर्बंध घालावेत अशी मागणी सुद्धा अलीकडच्या काळात होऊ लागले आहे. Youtube सारख्या प्लॅटफॉर्म मुळे अनेक तरुणांना एकमेकांशी जोडण्याचे साधन या युगामध्ये प्राप्त झाल्यामुळेच सगळं जग जरी इंटरनेटने जवळ आणलं असलं तरी या खेळामुळे सगळं जग पूर्णपणे धुंद झाला असून याचा परिणाम तरुणाई दिशाहीन आणि व्यसनाधीन होऊ लागलेले आहे त्यामुळे शासनाने या खेळावर बंदी घालावीच. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये देशातील तरुणांचे भविष्य हे अतिशय अंधकारमय होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. विज्ञान शाप की वरदान विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे .जसे आपण त्याचा वापर करू त्या पद्धतीने त्याचा आपल्याला फायदा होणार आहे.  परंतु आजचा तरुण याचा विचार न करता तो एका वेगळ्या आणि विध्वंसक दिशेने pubg गेम च्या वाटेने जाऊ लागल्यामुळे देशाचे भवितव्य सुद्धा अधोगतीकडे जाऊ लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिवसभर कष्ट करून घाम गाळून चार-पाचशे रुपये मिळवणारे तरुण सुद्धा रात्री अपरात्रीपर्यंत या पब्जी गेम मध्ये व्यस्त असतात. घाम गाळून मिळवलेला पैसा अशाप्रकारे हे तरुण उधळू लागल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा फार मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशा प्रकारचा विचार पालकातून सुद्धा पुढे येऊ लागलेला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments