Hot Posts

6/recent/ticker-posts

बॉलीवूड स्टार सोनाक्षी सिन्हा हिच्याकडून सोलापूरमध्ये कल्याण ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन

 बॉलीवूड स्टार सोनाक्षी सिन्हा हिच्याकडून सोलापूरमध्ये 

कल्याण ज्वेलर्सच्या शोरूमचे उद्घाटन 

महाराष्ट्रात कंपनीचे १७ वे शोरूम

ग्राहकांना मिळणार आलिशान खरेदीचा अनुभव

नव्या शोरूमच्या आनंदात मेगा डिस्काउंट ऑफरची घोषणा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील व्हीआयपी मार्गावर आज तुफान गर्दी उसळली होती. कल्याण ज्वेलर्सच्या व्हीआयपी रोड येथील नवीन शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी बॉलीवूड दिवा सोनाक्षी सिन्हाची एक झलक पाहण्यासाठी ही गर्दी उसळली होती. सोलापूरमध्ये नव्याने होत असलेल्या या नवीन शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सच्या विविध कलेक्शनमधील डिझाईन्सची विस्तृत श्रेणी आहे. जागतिक दर्जाच्या वातावरणासह ग्राहकांना येथे अत्याधुनिक सुविधा मिळू शकतात. कंपनीचे हे राज्यातील १७ वे शोरूम आहे.

याप्रसंगी बॉलीवूड स्टार सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “सोलापुरातील या भव्य सोहोळ्यात सहभागी झाल्याने मला खूप आनंद होत आहे. भारतातील दागिन्यांची परिभाषा ज्यांनी सातत्याने जागती ठेवली आहे, त्या कल्याण ज्वेलर्स या ब्रँडचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटतो आहे. कल्याण ज्वेलर्सच्या उत्कृष्ट डिझाईन्स या भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करते. हे भव्य शोरूम स्थानिकांना खरेदीचा अतुलनीय अनुभव देईल. येथील ग्राहक कल्याण ज्वेलर्सच्या या शोरूमला देखील उत्तम प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.''

नवीन शोरूमबद्दल बोलताना, कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक  रमेश कल्याणरामन म्हणाले, "कंपनी म्हणून, आम्ही मोठे टप्पे गाठले आहेत आणि ग्राहकांना खरेदीचा नवीन अनुभव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या वाढीच्या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणून सोलापूरमध्ये आमचे नवीन शोरूम सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. महाराष्ट्रात विस्तार करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यामुळेच ग्राहकांना सर्वोत्कृष्ट उत्पादने देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. विश्वास आणि पारदर्शकता ही कंपनीची मूलभूत मूल्ये जपत आम्ही कार्यरत असतो.''

या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी कल्याण ज्वेलर्स एक अनोखी ऑफर देत आहे: कमीतकमी १ लाखांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अर्ध्या खरेदी मूल्यावर 0% घडणावळ शुल्क असेल. या व्यतिरिक्त, कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट - बाजारातील सर्वात कमी आणि सर्व कंपनी शोरूममध्ये प्रमाणित - देखील लागू होईल. या ऑफर मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत.

कल्याण ज्वेलर्समधील सर्व दागिने हे BIS हॉलमार्क आहेत आणि अनेक शुद्धता चाचण्यांमधून जातात. ग्राहकांना खरेदीनंतर कल्याण ज्वेलर्सचे 4-स्तरीय हमी प्रमाणपत्र देखील मिळेल. जे शुद्धतेची हमी देते सोबतच दागिन्यांची मोफत आजीवन देखभाल, तपशीलवार उत्पादन माहिती आणि पारदर्शक देवाणघेवाणआणि बाय-बॅक पॉलिसी, अशा सुविधा देखील मिळतात. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर देण्याच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे.

कल्याण ज्वेलर्सच्या सर्व-नवीन शोरूम्समध्ये दागिन्यांचे वैविध्य उपलब्ध आहे. मुहूर्त - संपूर्ण भारतातून तयार केलेली वधूच्या दागिन्यांची श्रेणी. याशिवाय, तेजस्वी (पोल्की ज्वेलरी), मुद्रा (हस्तनिर्मित अँटीक ज्वेलरी), निमाह (टेम्पल ज्वेलरी), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअर सारखी डायमंड ज्वेलरी), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्व (विशेष प्रसंगांसाठीचे हिरे), अंतरा (लग्नाचे हिरे), हेरा (डेली वेअर डायमंड), रंग (मौल्यवान दगडांचे दागिने), आणि अलीकडेच लाँच झालेली लीला (रंगीत दगड आणि डायमंड ज्वेलरी), असे 'कल्याण'चे अन्य लोकप्रिय दागिने देखील आहेत.

ब्रँड, त्याचे कलेक्शन आणि ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी, https://www.kalyanjewellers.net/ ला भेट द्या.

आणि बाय-बॅक पॉलिसी, अशा सुविधा देखील मिळतात. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर देण्याच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे.

कल्याण ज्वेलर्सच्या सर्व-नवीन शोरूम्समध्ये दागिन्यांचे वैविध्य उपलब्ध आहे. मुहूर्त - संपूर्ण भारतातून तयार केलेली वधूच्या दागिन्यांची श्रेणी. याशिवाय, तेजस्वी (पोल्की ज्वेलरी), मुद्रा (हस्तनिर्मित अँटीक ज्वेलरी), निमाह (टेम्पल ज्वेलरी), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअर सारखी डायमंड ज्वेलरी), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्व (विशेष प्रसंगांसाठीचे हिरे), अंतरा (लग्नाचे हिरे), हेरा (डेली वेअर डायमंड), रंग (मौल्यवान दगडांचे दागिने), आणि अलीकडेच लाँच झालेली लीला (रंगीत दगड आणि डायमंड ज्वेलरी), असे 'कल्याण'चे अन्य लोकप्रिय दागिने देखील आहेत.

ब्रँड, त्याचे कलेक्शन आणि ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी, https://www.kalyanjewellers.net/ ला भेट द्या.

Reactions

Post a Comment

0 Comments