Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रा. नीता आळंगे यांना पीएचडी प्रदान..!

 प्रा. नीता आळंगे यांना पीएचडी प्रदान..! 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिद्द  चिकाटी आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर मनुष्य उंच शिखर गाठू शकतो. जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी सातत्य आणि मेहनत याची नितांत गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच यशाच्या शिखरावर पोहोचवण्याचा मान श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक सोलापूर येथील माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.  नीता संगप्पा आळंदे यांना मिळाला असून के एल .युनिव्हर्सिटी,  विजयवाडा विद्यापीठाकडून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग या विषयांमध्ये पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. 

के .एल. युनिव्हर्सिटी येथील प्राध्यापक डॉक्टर पी.  विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी  पीएचडी पूर्ण केली आहे.  पीएचडी चा अभ्यास पूर्ण करण्यासाठी डॉ.  गीता आळंगे,  डॉ.  हेमंत आळंगे, अँड.  राजशेखर आळंगे, दीपक आळंगे,  बाळासाहेब आळंगे, आणि सीए महेश आळंगे या सर्वांचे नीता आळंगे यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. 

माहिती आणि तंत्रज्ञान युगामध्ये पीएचडी करून डॉक्टरेट होण्याचा बहुमान प्रा.  नीता आळंगे  यांना मिळाल्या नंतर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक बॉडीचे अध्यक्ष  धर्मराज काडादी, गव्हर्निंग बॉडीचे सदस्य अँड.  आर .एस .पाटील, श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे, कॉलेजमधील विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

प्रा.  नीता आळंगे  यांनी यशाची पताका फडकावील्यानंतर त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments