लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी व
लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाला "जय जवान जय किसान" हा मंत्र देण्यारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमोल शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयातील विद्यार्थी वैष्णवी मागाडे, सोहम बोधले, प्रज्ञा मंद्रूपकर यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा जीवनप्रवास व कार्य, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीतील त्यांचे योगदान याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयात स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपले कार्यक्षेत्र व परिसरात स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. प्राचार्य डॉ अमोल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यापासून आपण प्रेरणा घेऊन त्यांनी दिलेली अहिंसा, समता, बंधुता, वैचारिक परिपक्वता ही तत्वे अंगिकारली पाहिजेत. तसेच देशाच्या व समाजाच्या सार्वभौम विकासासाठी स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रा. सागर महाजन, प्रा. प्रदीप आदलिंगे, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. नंदकिशोर खुने, प्रा. पुनम उंबरे, प्रा. सायली बडेकर, प्रा. चारुशीला बंदसोडे तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी सोनाली उन्हाळे हीने केले.
.png)
0 Comments