Hot Posts

6/recent/ticker-posts

निष्पाप रुग्णांचा बळी घेणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो- ॲड.एम.एच.शेख.

 निष्पाप रुग्णांचा बळी घेणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो-

 ॲड.एम.एच.शेख. 

सिटू ने पाळला काळा दिवस !


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागरिकांच्या मूलभूत गरजा पैकी अत्यंत महत्वाची गरज आरोग्य सुविधा होत.आज राज्य सरकार च्या राम भरोसे कारभारामळेच संभाजी नगर आणि नांदेड च्या शासकीय रुग्णलयात जवळ जवळ 35 निष्पाप रुग्ण  दगावले.70 हून अधिक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.हे अत्यंत गंभीर बाब आहे याला सर्वस्वी राज्य सरकारच आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत जबाबदार आहेत.याचा तीव्र शब्दांत निषेध केले तसेच या हृदयद्रावक घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा सिटू आक्रमक पवित्र्यात उतरेल असा जाहीर इशारा  सिटू चे राज्य महासचिव ॲड.एम.एच.शेख यांनी केली.

मंगळवारी सिटू चे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने  3 ऑक्टोबर हा दिवस देशभर काळा दिवस पाळत असून त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा समिती मार्फत सिटू चे राज्य सचिव कॉ पुष्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी व्यापीठावर कॉ. सिद्धप्पा कलशेट्टी, कॉ युसुफ मेजर, कॉ रंगप्पा मरेड्डि,विल्यम ससाणे अँड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती.

ॲड.एम.एच.शेख बोलताना पुढे म्हणाले की,  3 ऑक्टोबर 1945 साली कामगारांना संरक्षण देणे आणि त्यांच्या अधिकार मिळवून देणे आणि यासाठी लढ्याच्या माध्यमातून हस्तक्षेप करणारी जागतिक कामगार संघटनाचे महासंघ अर्थातच WTFU चा वर्धानदिन आहे. ती बांधिलकी  जोपासली पाहिजे. तसेच 3 ऑक्टोबर 21  केंद्र सरकार च्या तीन कृषी काळ्या कायद्याच्या विरोधात शेतकरी सनदशीर मार्गाने आंदोलन करताना  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे नक्षत्र सिंग, गुरविंदर सिंग, लवप्रीत सिंग आणि दलजीत सिंग या चार शेतकरी सह एका पत्रकार दगावले.या हिंसाचारात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे याबाबत अद्यापही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चकार शब्द ही काढत नाहीत.ही लाजिरवाणे गोष्ट आहे. प्रास्ताविक कॉ. व्यंकटेश कोंगारी यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन व आभर प्रदर्शन ॲड.अनिल वासम यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments