मराठा आरक्षणासाठी शहर - जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू करावे.
सकल मराठा समाजाचा निर्णय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती .१७ दिवसाचे त्यांचे उपोषण सरकारने एक महिन्यात आरक्षणाचा निर्णय घेतो असे सांगून जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते. सरकारला ३० दिवसापेक्षा अधिक दहा दिवसाची मुदत देण्यात आली होती. सदरची मुदत काल २४ ऑक्टोबरला संपल्यामुळे सरकारच्या विरोधात शहर आणि जिल्ह्यात मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू करून मनोज जरांगे पाटलांचे हात बळकट करावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने माऊली पवार यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे पुढील आदेश येइपर्यंत मराठा समाजाने , तालुक्याच्या ठिकाणी , जिल्हापरिषद गटातील मोठे गाव , तहसील ऑफिस समोर , जी . प.समोर मराठा बांधवांनी साखळी उपोषण करावे असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथून सघ्या दिला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्हातील मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटील यांना ताकत देण्यासाठी व त्यांचे हात बळकट करण्यासाठी आज २५ ऑक्टोबरपासून पुढील आदेश येइपर्यंत साखळी उपोषण करावे असे आवाहन सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्हा करत आहे. तसेच गावपातळीवर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना (आमदार ,खासदार, मंत्री) यांना गाव बंदि करतील. त्यांना गावात कोणतेही कार्यक्रम घेवू देऊ नका. सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहून साखळी उपोषण यशस्वी करावे.
.jpg)
0 Comments