Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल एबीएम महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत बक्षीस वितरण कार्यक्रम

 लोकमंगल एबीएम महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत बक्षीस

 वितरण कार्यक्रम


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. अमोल शिंदे प्राचार्य कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, समन्वयक कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय वडाळा, प्रा. योगेश गायकवाड प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था वडाळा उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे औज या गावी घेण्यात आला. यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक मुक्त अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम इ. उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट स्वयंसेवक व स्वयंसेविका म्हणून घोषित करण्यात आले. सर्व स्वयंसेवकांना भेटवस्तू देण्यात आल्या. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योती गायकवाड व आभार प्रदर्शन डॉ. तृप्ती राठोड यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments