महापालिकेचा आदेश झुगारून शहरात पुन्हा बेकायदेशीर डिजिटल चे अमाप पीक...!
सोलापूर (दादासाहेब निळ):- सोलापूर शहरामध्ये बेकायदेशीर डिजिटल लावण्याची प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे महापालिकेच्या वतीने नो डिजिटल झोन जाहीर करून बेकायदेशीर डिजिटल फलक लावणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला. एवढंच नव्हे तर परवाना असल्याशिवाय जर डिजिटल छापून दिला तर छपाई करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश आयुक्त शितल तेली उगले यांनी दिले होते. परंतु नव्याचे नव दिवस याप्रमाणे सध्या या आदेशाला झुगारून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शेकडो डिजिटल फलक लागलेले दिसत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर विनापरवाना उभा केलेले डिजिटल मोठ्या प्रमाणात आहेत. महापालिकेच्या आदेशाला ठेंगा दाखवल्यामुळे या प्रक्रियेचा फज्जा उडाल्याची चर्चा सध्या शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरामध्ये होर्डिंग डिजिटल लावण्यासाठी महापालिकेमार्फत ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली असून या प्रणालीमध्ये अर्ज करत असताना अर्जदाराचे आधार कार्ड व लावण्यात येणाऱ्या डिजिटल फ्लेक्स चे डिझाईन अपलोड करणे ,पोलीस स्टेशनची पोलीस स्टेशनची ऑनलाईन एनएससी चालू करण्याची गरज आहे तसेच फलकावर तसेच फलकावर क्यू आर कोड घाल बंधनकारक करण्यात आले होते. परवानगीचा कालावधी व्यतिरिक्त इतर दिवशी जर एखाद्याने डिजिटल बॅनर्स लावल्यास प्रति दिवस प्रति होर्डिंग 1000 रुपये इतका दंड आकारण्यात येईल असा गंभीर आणि तंबीयुक्त इशारा महापालिकेच्या प्रशासनाकडून आयुक्त शितल तेरी उगले यांनी दिला होता. मात्र हा इशारा हवेतच विरला असून सोलापूर शहरातील काही हौशी मंडळींनी पालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अनेक ठिकाणी डिजिटल उभे करून दुष्काळात सुद्धा आम्ही हे पीक घेऊ शकतो असेच आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. सोलापूर शहरात त गणेश उत्सव आणि पैगंबर जयंती मोठे उत्साहात साजरा करण्यात आलाी . यानिमित्ताने शहरातील नो डिजिटल झोन जाहीर करण्यात आला होता. शहरातील प्रमुख मार्ग, चौक ,रस्ते आणि विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल चे पीक बेसुमार वाढू लागल्यामुळे रीतसर परवानगी घेणाऱ्यांची संख्या मात्र बोटावर मोजणी एवढी असल्याचे दिसून आलेलं आहे. याचबरोबर ज्या वेळेत नोंदणी करून डिजिटल फलक लावले आहेत त्यांची वेळ संपल्यानंतर सुद्धा ते तसाच डिजिटल लावून फाटला तरी काढत नाहीत. अशा संस्था आणि नागरिकांवर महापालिकेच्या माध्यमातून आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या नाकावर बिनधास्तपणे डिजिटल लावण्याची जणू स्पर्धा दिसून येत आहे. महापालिकेच्या वतीने जोपर्यंत अशा चुकीच्या संस्था किंवा व्यक्तींवर कठोर आणि दंडात्मक कारवाई होणार नाही तोपर्यंत हे डिजिटल रुपी पिक सोलापूर शहरामध्ये दुष्काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फुलणार...! यात दुमत नाही.बेकायदेशीरपणे लावलेली डिजिटल काढण्यासाठी महापालिकेचे अधिकारी का पुढे येत नाहीत. असा सवाल नागरिकांमधून विचारला जात असून चिरीमिरीची सवय लागलेल्या या अधिकाऱ्यांना डिजिटल वाले सुद्धा खुराक पुरवत असल्यामुळेच अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा शहरवासीयांमध्ये होऊ लागली आहे.
.jpg)
0 Comments