Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्याच्या तडवळेत पब्जीमुळे १७ वर्षीय विद्यार्थ्यांची विषारी औषध पिऊन आत्महत्या,माढा तालुक्यात उडाली खळबळ

 माढ्याच्या तडवळेत पब्जीमुळे १७ वर्षीय विद्यार्थ्यांची विषारी औषध

 पिऊन आत्महत्या,माढा तालुक्यात उडाली खळबळ 



माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील तडवळे गावातील १७ वर्षीय विद्यार्थ्याने पब्जी या ऑनलाईन गेम च्या आलेल्या तणावातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. दिनेश कांतीलाल परबत असं शेतातील किटकनाशकाचे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.दिनेश ला अनेक महिन्यांपासून पब्जी या ऑनलाईन गेम खेळण्याचा छंद जडला होता.तो इतका या छंदात अडकला गेला की तो नैराश्याच्या गर्केत अडकुन पडला.आणी त्याने पब्जी गेम खेळताना आलेल्या तणावाने विषारी औषध प्राशन करुन जीवन संपवले आहे.दिनेश ला उपचारासाठी कुर्डूवाडीतील खासगी रुग्णालयात आणण्यात आले.मात्र त्याचा मृत्यु झाला.दिनेश हा १० वी  उत्तीर्ण विद्यार्थी होता. १० वी नंतर त्याने  १ वर्षाचा आयटिआयचा कोर्स देखील केला होता.दिनेशच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असुन दिनेश हा आईला एकटाच आधार होता. त्याच्या जाण्याने परबत कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन दिनेशच्या पश्चात आई आहे.पब्जी गेममुळे माढ्याच्या ग्रामीण भागातील तरुणाने तणावातून आत्महत्या केल्याच्या घटनेचे सर्वत्र खळबळ उडालीय.या घटनेच्या पाश्र्वभूमीवर पालकांनी देखील आपल्या मुला मुलींकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असुन आपली मुले मुली मोबाईल नेमकं काय करतात..पब्जी च्या आहारी तर गेली नाहीत ना ? हे देखील पहायला हवं.

Reactions

Post a Comment

0 Comments