AIMIM पक्षाच्या वतीने फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी
जयंती निमित्त राबविले स्वच्छता अभियान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी जयंती निमित्त शनिवार पेठ परिसर व जिजामाता दवाखाना येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आली.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आली. या अभियानास एआयएम पक्षाचा प्रतिसाद म्हणुन सोलापुरातील प्रभाग क्र. 14 मधील शनिवार पेठपरीसर व जिजामाता दवाखाना येथे स्वच्छता करण्यात आली.
यावेळी नगरसेविका वाहेदा भंडाले, राजा सर बागवान, जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद, नगरसेवक अझहर हुंडेकरी, युवाध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर, याकुब शेख एम आर, इम्रान हवालदार, मुज्जमिल इंडीवाले, अझहर कोरबु, अनिसा डोका, अब्दुरहेमान मोहोळकर, अनिसा मोगल, मचिंद्र लोकेकेर, एजाज बागवान, शहबाज मुतवल्ली, वसिम तलवार अशपाक बागवान, ओझेब शेख, पक्षतील सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments