Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निकमध्ये माजी विद्यार्थिनींचा मेळावा संपन्न

 श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निकमध्ये माजी विद्यार्थिनींचा मेळावा संपन्न


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील श्री. सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निक येथे माजी विद्यार्थिनींचा मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रजलानाने करण्यात आले. याप्रसंगी माजी विद्यार्थिनींनीं त्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि त्यांच्या जीवनाच्या एकंदरीतच जडणघडणीमध्ये श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निक महाविद्यालयाचा खूप मोठा योगदान असल्याचे नमूद केले तसेच कॉलेजमध्ये असताना विविध स्पर्धा परीक्षांच्या आयोजनामुळे आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी गव्हर्निंग बॉडीचे सदस्य ॲड. आर. एस. पाटील, कॉलेजचे प्राचार्य गजानन धरणे, ॲल्युमिनी प्रमुख प्रा. शिल्पा देशमुख, विद्यार्थिनी प्रतिनिधी उपस्थित होते. प्राध्यापिका शिल्पा देशमुख यांनी कॉलेजच्या जडणघडणीमध्ये माझ्या विद्यार्थिनींचा फार मोठा योगदान आहे व माजी विद्यार्थिनींनी सर्व क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. ॲड. आर. एस. पाटील यांनी विद्यार्थिनींच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्य गजानन धरणे यांनी विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाविद्यालय नेहमी तत्पर असते व  विद्यार्थिनींनी योगदान द्यावे तसेच विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्था विद्यार्थिनींना प्रत्येक स्तरावर नेहमी मदत करते असे नमूद केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. गायत्री लंगोटे, प्रा. प्रीती केशेट्टी, प्रा. जोडमुठे, प्रा. धनशेट्टी, प्रा. मृदुला हरसूरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा. श्रीशैल मळेवाडी व आभार प्रदर्शन प्रा. प्रमोद मेंणसे यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments