Hot Posts

6/recent/ticker-posts

वैरागमधील जगदंबा परिवारातील चार शाळांना राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार..

 वैरागमधील जगदंबा परिवारातील चार शाळांना राज्यस्तरीय

 आदर्श शाळा पुरस्कार..

वैराग (कटूसत्य वृत्त):-कै. शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांच्या जय जगदंबा परिवारातील चार शाळा व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले.समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पत्रकारांचा बहुउद्देशीय संघ भारत सरकार मान्यताप्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघामार्फत जय जगदंबा परिवारातील नवीन मराठी

प्राथमिक विद्यालय पंचशील नगर वैराग, सरस्वती प्रशाला सिंदफळ, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जामगाव, जय जगदंबा विद्यालय ढवळस या शाळांना राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच प्राचार्य खंडेराया घोडके, मुख्याध्यापक स्वरूप सोनवणे, भिवाजी खरटमोल, विजया चव्हाण, श्रीराम मोरे, धनाजी डोईफोडे, बाबुशा काळे यांना कृतिशील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार जाहीर झाले आहेत.

कै. संजय नवले यांना मरणोत्तर कृतिशील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण रविवार, १० सप्टेंबर रोजी सोलापुरात होणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा कोरके, सचिव डॉ. आमिता कोरके, डॉ. शीतल कोरके, काकासाहेब कोरके, विनायक डोईफोडे, आनंद कोरके, उज्जेश करडे, सुरेश गुंड, सुभाष सुरवसे, बाळासाहेब देशमुख, धनवंत झालटे यांनी अभिनंदन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments