लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक साक्षरता दिन
उत्साहात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात साक्षरता दिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती माता प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील वैष्णवी मागाडे अंशुल राठोड, निलेश स्वामी आदींनी आपल्या मनोगतातून साक्षरता दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अमोल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना साक्षरता दिनाचे महत्त्व पटवून सांगताना सांगितले की शिक्षण व साक्षरता या दोन गोष्टींवर आपले आयुष्य अवलंबून आहे. साक्षरता दिवस हा वैयक्तिक, सामाजिक व राजकीय साक्षरतेबरोबरच शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. तसेच एक परिपूर्ण माणूस होण्यासाठी आपल्याला शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासोबतच सामाजिक, राजकीय अध्यात्मिक तसेच सांस्कृतिक ज्ञान असणे आवश्यक आहे असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी धम्मेश गवळी व आभारप्रदर्शन विद्यार्थी स्वामी निलेश यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वयन महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमास प्रा सागर महाजन, प्रा. प्रदीप आदलिंगे, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. नंदकिशोर खुणे, प्रा. सायली बडेकर., प्रा. पुनम उंबरे, प्रा. चारुशीला बंदसोडे , वरिष्ठ लिपिक सचिन डोईजोडे तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
.png)
0 Comments