Hot Posts

6/recent/ticker-posts

"जागतिक स्वच्छ वायु दिवस" निमित्त दयानंद शिक्षण संस्थेत मियावाकी वृक्षारोपण समारंभ संपन्न

 "जागतिक स्वच्छ वायु दिवस" निमित्त

 दयानंद शिक्षण संस्थेत  मियावाकी वृक्षारोपण समारंभ संपन्न


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका, दयानंद शिक्षण संकुल, एच डी. एफ.सी. बँक, पर्यावरण संरक्षण गतीविधी, भाग्यलक्ष्मी रोपवाटिका यांच्या संयुक्त विद्यामाने मियावाकी वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डी.बी.एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्टस, ॲन्ड सायन्स, सोलापूर चे प्राचार्य, डॉ. विजयकुमार पां. उबाळे यांच्या कडे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मच्छिंद्र घोलप, उपायुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्या हस्ते वृक्ष जल अर्पण करून उद्घाटन  करण्यात आले. यावेळेस सोमपा पर्यावरण विभागाचे स्वप्नील सोलनकर, एचडीएफसी बँक चे अधिकारी विनायक कुलकर्णी, आमले, राहुल शहा, इंगळे, व सौ नीलकंठ मिठ्ठा, शिवाजी कदम, प्रवीण तळे करण्यात आले.  दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने पाहुण्यांचे सन्मान चिन्ह शाल व बुके देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. यानंतर या कार्यक्रमाचे समन्वयक प्रविण तळे यांनी मानवी जीवनातील निसर्गाचे स्थान आणि भावी पिढीसाठी वृक्षाचे महत्व, प्राप्त, तसेच सोलापूर व परिसरात आज पर्यंत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचा लेखाजोखा सादर केला. पर्यावरण व त्याचे संवर्धन व गरजा याबद्दल त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.  सदरील प्रकल्प हा एचडीएफसी बँकेच्या गो ग्रीन प्रकल्प ऑगस्ट 2023 अंतर्गत सीएसआर फंडिंग च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी या माध्यमातून पाण्याची ड्रिपच्या माध्यमातून व्यवस्था संरक्षक कुंपण त्यातून चालण्यासाठी पाचवे तसेच आपल्या वातावरणात उपयोगी असणारे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप म्हणाले की सोलापूर जिल्हयासह सर्व नागरिक, शिक्षक, विद्यार्थी यांना प्लास्टिक मुक्त व प्रदूषणमुक्त सोलापूर शहर राखण्यासाठी आव्हान केले.  त्यांनी आपल्या भाषणात पर्यावरण संरक्षण व त्याची गरज आपल्या भौतिक प्रगती बरोबर आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी याचे महत्त्व विशद केले यापूर्वी त्यांनी अनेक ठिकाणी प्रशासकीय कामकाज करत असताना त्यांनी राबवलेले उपक्रम याचा आढावा घेऊन विद्यार्थी, पालक, निसर्गप्रेमी नागरिक, महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर वर्ग यांना मार्गदर्शन केले. विनायक कुलकर्णी एचडीएफसी बँक क्लस्टर ऑफिसर यांनी या प्रोजेक्टच्या माध्यमातून बँक समाजासाठी कशा पद्धतीने कामकाज करते व योगदान देते याबद्दल सविस्तर माहिती दिली बँकेने आजपर्यंत केलेले विविध ठिकाणी वृक्षरोपण व इतर कार्यक्रम तसेच बार्शी व इतर ठिकाणी हाती घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पांडुरंग उबाळे   यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव महेश चोप्राजी यांच्या मार्गदर्शनातून व सूचनानुसार हा प्रकल्प करण्यात येत असल्याचे सांगितले, तसेच भविष्यात संस्थेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना समोर ठेवल्या त्यासाठी आवश्यक असणारे फंडिंग साठी योगदान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. भविष्यकालीन योजना साठी महाविद्यालयातून संस्थेच्या परिसरातून जाणारा नाला, त्याच्या स्वच्छतेबाबत तसेच गेलेला हमरस्ता यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय योजना यांची मांडणी केली.  पहिल्या टप्प्यात  5000 झाडे लावण्यात येतील. त्याचा आज प्रतिकात्मक वृक्षारोपण कार्यक्रमातून करण्यात आला. यावेळेस वृक्षारोपणासाठी तयार करण्यात आलेल्या फलकाचे माननीय उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी एनएसएस एनसीसी या विभागाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी पुढील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विनायक कुलकर्णी क्लस्टर हेड, च.डी.एफ.सी. बँक, सोलापूर, निलकंठ मिट्टा- भाग्यलक्ष्मी रोवाटिका, सोलापूर, राहुल शहा उद्योजक, सोलापूर,शिवाजी कदम वरिष्ठ संरक्षण अधिकारी, सोलापूर, मच्छिंद्र घोलप उपायुक्त, सोलापूर महानगरपालिका,अरविंद सालक्की उद्योजक, सोलापूर,डॉ. सुनिल इंगळे सी.ए.. सोलापूर,स्वप्निल सोलनकर पर्यावरण अधिकारी, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर - डॉ. व्ही. पी. उबाळे,प्रशासक व प्राचार्य,डॉ. एस. व्ही. शिंदे प्राचार्य,डॉ. एस. बी. क्षीरसागर प्राचार्य डॉ. एस. जे. गायकवाड प्राचार्य.  प्रा. बी. एच दामजी आणि दयानंद शिक्षण संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी पालक तसेच व त्यांचे सहकारी यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. के जे शिंदे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर ए रणवरे यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमानंतर अल्पोपहार देण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments