कोट्यावधी रुपयांचा चुराडा करणारा "शासन आपल्या घरी" हा पंढरपूर
येथील कार्यक्रम रद्द करा.. अन्यथा कार्यक्रम स्थळी आंदोलन करण्याचा
सरपंच परिषदेनं दिला इशारा..!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या राज्यामध्ये आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. खरिपाची सर्व पिके गेल्यामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. त्याचबरोबर दुधाचे भाव घडल्यामुळे आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार "शासन आपल्या दारी" हा कार्यक्रम घेऊन कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी करत असल्याचा आरोप सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. विकास जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जाधव पुढे म्हणाले, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही परिषद सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्न करत असलेली संस्था आहे. राज्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य या संघटनेची जोडले गेलेले असल्यामुळे सरकार कोणतेही असो सरकारच्या विरुद्ध ग्रामीण भागाच्या समस्यांची सोडवणूक होत नसेल, अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सातत्याने चालू आहे. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश सरचिटणीस राजू पोतणीस आणि कोषाध्यक्ष आनंद जाधव यांच्या नेतृत्वा खाली सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत सक्षम करण्याचं काम जोमाने आणि सातत्याने सुरू असल्याचंही यावेळी बोलताना उपाध्यक्ष विकास जाधव यांनी सांगितले. आज पर्यंत सरपंच परिषदेने अनेक आंदोलन यशस्वी केलेली असून शासनाच्या चांगल्या निर्णयाचे कौतुक सुद्धा केलेलं आहे. सध्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये विदारक परिस्थिती निर्माण झाल्या असून पंचायत समिती या जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्यामुळे ग्रामपंचायतीचे कामे करताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर राज्यातील जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुद्धा बोकाळलेला आहे. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी सरपंच परीक्षेच्या वतीने कराड ते सातारा पायी मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर हा मोर्चा मुंबईकडे थेट मंत्रालयावर जाऊन धडकनार होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी सहकार मंत्री अतुल सावे आणि आमदार प्रवीण दरेकर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर यांना चर्चेसाठी पाठवून हजारोच्या संख्येने मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाला थांबवलं आणि मिटींग लावण्याचे आश्वासन दिलं.
यानंतर सह्याद्री अतिथी ग्रह या ठिकाणी सरपंच परिषद व रयत क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना यांची स्वतंत्र बैठक लावून यांच्या मागण्या मान्य करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊन सुद्धा दोन अडीच महिने झाले तरी गिरीश महाजन यांनी या संदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यामुळे गिरीश महाजन यांनी ग्रामविकास मंत्री पदाचा राजीनामा द्यावा. कारण त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. एकंदरीत शासनाने सरपंच परिषदेच्या आंदोलनाची मस्करी करून खोटे आश्वासन देऊन फसवणूक केलेली आहे. त्याचबरोबर सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे दुधाचे भाव घडल्यामुळे जनावरांच्या साऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेला असताना आणि बार्शी तालुक्यातील आठ हजार लोकांना पन्नास वर्षापासून गायरान जमिनीवर स्थायिक असलेल्या नागरिकांना अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिल्यामुळे हे सरकार गोरगरिबांचे नसल्याचे दिसत आहे . या नागरिकांच्या हक्कासाठी सरपंच परिषदेच्या वतीने पानगाव येथे रास्ता रोको आणि बार्शी तहसीलवर मरून उपोषण सुरू केल्यानंतर महसूल प्रशासनाने कार्यवाही करू असे आश्वासन दिले परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यामुळे महसूल प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करत असल्याचं जाधव यांनी सांगितलं. शासन आपल्या दारी हा उपक्रम सरकार राबवत असताना खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांची कामे प्रशासन करते किंवा नाही याची खात्री जमा न करता आपण असे उपक्रम राबवून शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा चुरडा करत आहात. असं स्पष्ट मत सरपंच परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आलंआहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून अनेक वर्षापासूनच्या सुरू असलेल्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना यापूर्वीच मिळालेला नाही त्याची आकडेवारी जाहीर करून शासन काय साध्य करणार...? असा प्रश्न निर्माण झाला असून शासन आपल्या दारी या उपक्रमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाच्या पदरात काहीच पडणार नाही याची खात्री असल्यामुळेच पंढरपूर येथील कार्यक्रमास सरपंच परिषदेचा तीव्र विरोध असल्याचं यावेळी विकास जाधव यांनी स्पष्ट सांगितलं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी दोन वेळा गैराण व गावठाण मधील युवासेवास्तव्य निमाधीन करणार अशा घोषणा दिल्या परंतु त्याचे अद्याप अमूल बजावणी झालेली नसल्यामुळे नुसत्या घोषणा देणारे सरकार असल्यामुळे शासन आपल्या दारी हा उपक्रम केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्पर्धापोटीच हा फार्सं शासनाच्या वतीने होत असल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात मोठी चिड निर्माण झालेली आहे. त्यामुळे दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी पंढरपूर येथील वाखरी नजीक होणारा शासन आपल्या दारी हा नियोजित कार्यक्रम रद्द करावा अन्यथा सरपंच परिषदेच्या वतीने ज्या ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे. अशा हजारो नागरिकांसह सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी शांततामय, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
0 Comments