नवोपक्रमशील, आदर्श शिक्षक, उपक्रमशील मुख्याध्यापक , उत्कृष्ट
क्रिडापट्टू ते यशस्वी शिक्षक नेता:- संतोष वैजनाथराव पिट्टलवाड.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याचा
शिल्पकारजबरदस्त इच्छाशक्ती व लढवय्या शिक्षक नेता
आधी स्वतःची शाळा गुणवत्तापूर्ण बनवा मग शिक्षकांचे प्रश्न
सोडविण्यासाठी लढा म्हणणारा राज्यातील एकमेव राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड
२००५ पासुन पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून जि. प. प्रा. शाळा घोलप आवाड करी येथुन संतोष पिट्टलवाड यांच्या शिक्षकी पेशाला सुरवात झाली. घोलप आवाड ही व्दिशिक्षकी शाळा होती. सोबतच्या सहकार्यांनी शाळेत बांधकाम करत असताना ठेकेदाराने दगा दिल्याने पैशाची खूप मोठी अडचण निर्माण झाली. तशाही परिस्थितीत दोघा शिक्षकांनी बर्याच वेळा गंवड्याच्या हाताखाली माल कालवून देणे, पाणी मारणे, विटा देणे अशी कामे करुन शाळा बांधकाम पुर्ण केले. सहकारी शिक्षकांची बदली झाल्यानंतर संतोष पिट्टलवाड सरांकडे मुख्याध्यापक पदाचा चार्ज आला. एक ते दिड वर्षे ते शाळेवर एकटेच होते. चार वर्ग सर्व शालेय कामकाज त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले. शिष्यवृत्ती परिक्षेत १०० टक्के निकाल, दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक, शैक्षणिक काम करत आसताना सरांनी २००८ मध्ये जवळपास ३० हजार रुपये लोकवर्गणी जमा करून लातुर पॅटर्न प्रमाणे शाळेची रंगरंगोटी केली. शाळेचे बाह्यांग व अंतरंग बालस्नेही आणि सुंदर बनवले. १ ली ते ४ थी संपूर्ण अभ्यासक्रम दोन वर्गात व शालेय परिसरात बसवला गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज खेळता खेळता शिकण्यास मदत होऊ लागली. त्याचा परीणाम स्वरूप शाळेची गुणवत्ता वाढली. सरांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर शिक्षकांना नवचैतन्य देण्यासाठी शिक्षक संघाच्या माध्यमातून मराठवाड्यात ज्या प्रमाणे कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धा होतात, त्याच धरतीवर भोर तालुक्यात २००८ पासुन शिक्षक कर्मचार्यांच्या व पंचायत समिती कर्मचार्यांच्या स्पर्धेचे आयोजन करुन यशस्वी करुन दाखवल्या. त्यात महिला शिक्षकांच्या ही स्पर्धा घेतल्या गेल्या. आजतागायत त्या स्पर्धा भोर तालुक्यात भरवल्या जातात. एक उत्क्रृष्ट खेळाडू म्हणुन सरांची तालुकाभर ओळख निर्माण झाली.
२०११ मध्ये सरांची आंतरजिल्हा बदली झाली व लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथील जिल्हापरिषद शाळेत नियुक्ती मिळाली. नियुक्ती मिळालेल्या वर्षीच उस्तुरी येथे सेमी इंग्रजीच्या १ ली च्या वर्गाची सुरूवात झाली. सरांची नविन नियुक्ती आसल्याने साहजिकच ज्युनिअर म्हणून जो वर्ग दिला गेला. तो त्यांनी निमुटपणे संभाळला. त्यामुळे सरांनी सेमी इंग्रजीच्या वर्गाचे चॅलेंज स्विकारले व लातुर येथील सेमि इंग्रजीच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष अध्यपनाला सुरूवात केली. सेमी इंग्रजी वर्गासाठीच्या कोणत्याच बाबी शाळेकडे नव्हत्या. पुस्तके देखील मिळाली नव्हती. अशाही परिस्थितीत मिळेल तिथुन पुस्तके उपलब्ध करुन अध्यापनास सुरवात केली. यापूर्वी पुणे जि. प. ला असताना वर्गात अभ्यासक्रम बसवून जशी गुणवत्ता वाढविण्यास मदत झाली होती, तसाच प्रयत्न सरांनी करावयाचे ठरवले. परंतु दहा शिक्षकी शाळेत सर्वात नविन शिक्षकाचे ऐकणार कोण? अशा परिस्थितीत सरांनी प्रयत्न करुन मुख्याध्यापकांना आपली कल्पना सांगितली. मुख्याध्यापकांना त्यांची कल्पना आवडलीही. पण सर्वांपुढे पैशाची अडचण निर्माण झाली. यापूर्वी याच शाळेतील एका मुख्याध्यापकांना गावकर्यांच्या तक्रारीवरून घरचा रस्ता धरावा लागला होता. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे मदत कशी आणि कोण मागणार ? सर्व सहकारी माघार घेवू लागले. परंतु शांत बसेल तो माणुस कसला. स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर सरांनी सरळ सरपंचांच्या कानावर हा विषय घातला. त्यांनाही सरांची कल्पना आवडली. सरपंच म्हणाले, “सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आम्ही वर्ग तयार करुन देऊ. परंतु आम्हाला गुणवत्ता हवी.” सरांनी सरपंचांना शब्द दिला गुणवत्ता नक्कीच दिसेल. गुणवत्ता दिसली तरच आपण पुढचे वर्ग तयार करु. नाहीतर आपले पैसे पाण्यात गेले असे समजु. सरांनी दिलेला शब्द तंतोतंत पाळला पहिला वर्ग अतिशय सुंदररित्या पेंटर कडुन तयार करुन घेतला. सर्व महत्त्वाच्या बाबी त्यात काढल्या गेल्या. यासाठी सरांनी खूप मेहनत घेतली. शाळेचे रुप हळू हळू पालटू लागले. मार्च अखेर पहिलीचा वर्ग तालुक्यातील एक नंबरचा वर्ग बनला. विद्यार्थांचे वाचन, लेखन, संभाषण, सर्व कौशल्य खुप चांगल्या प्रकारे विकसित केले. अख्या शाळेत १लीची मुले इंग्रजीत संभाषण करु लागली. हे सर्व पाहुन सरपंच व ग्रामस्थांनी मार्चमध्येच शाळेत येऊन दुसरीच्या वर्गाच्या रंगरंगोटीची तयारी करण्याबाबत सांगितले. लोकसहभागातून दरवर्षी एक एक करत सातही वर्गांची रंगरंगोटी पूर्ण केली. यामुळे शाळेची गुणवत्ता तर सुधारलीच परंतु शालेय परिसर देखील देखना झाला. शाळेकडे पालकांचा, ग्रामस्थांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. लोक स्वतः होऊन शाळेतील मुलांना दरवर्षी शिष्यवृत्ती देऊ लागले. दरवर्षी लाखो रुपयांचा लोकासहभाग शाळेला मिळत गेला. सुरुवातीला नकारात्मक असणारे सहकारीही सकारात्मक झाले. शाळेचा चेहरा मोहरा बदलला. शाळेची गुणवत्ता वाढली. लोकांचे सहकार्य वाढले. लोकवाट्यातुन शाळेची भरभराट झाली. आजही निलंगा तालुक्यात उस्तुरी हि १ली ते ७ वी पर्यंतची सेमी इंग्रजीचे वर्ग असणारी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणुन नावलौकीक आहे. त्यानंतर सरांची बदली २०१९ मध्ये औसा तालुक्यातील जमालपुर येथे झाली. त्यांची बदली झाली त्याचवर्षी पाचवीचा वर्ग बंद झाल्याची आफवा काही लोकांनी उठवली. त्याच वेळी सरांनी आपली गाठ संकटांशी पडलेली आहे हे ओळखले. आल्या आल्या सरांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. ही व्दिशिक्षकी शाळा त्यात १ली ते ५वी चे वर्ग. सरांकडे मुख्याध्यापक चार्ज. छोटे गाव. त्यातच शाळेची निवड बाला उपक्रमासाठी झाली. बाला उपक्रमासाठी लोकवाटा जमा करणे खुप मोठे काम होते. गावातील सकारात्मक विचार करणार्या लोकांना सोबत घेऊन तसेच काही जुन्या शिक्षकांची मदत घेऊन जवळपास १६००००. रुपयांचा रोख लोकवाटा व वीस हजार रुपयांचा वस्तुस्वरूपातील लोकवाटा जमा केला. बाला उपक्रमातील सर्वच्या सर्व घटक अतिशय चांगल्या प्रकारे तयार केले. बालाचे एक आदर्श माॅडेल तयार केले. १५ जुलै पूर्वी झालेल्या मुल्यांकनात १०० पैकी १०० गुण प्राप्त करणारी औसा तालुक्यातील एकमेव शाळा ठरली. अल्पावधितच शाळेचा कायापालट केला. शाळेचे नाव सर्वदुर पोहोचविले. दोन विद्यार्थी शासकिय विद्यानिकेतन औरंगाबादसाठी पात्र झाले. सर जिथे जातील तिथल्या शाळेत ते नंदनवन केल्याशिवाय राहत नाहीत.याचीच दखल घेऊन लातुर जिल्हा परिषदेने सरांचा उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणुन जिल्हास्तरावर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन सत्कार केला.मा. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनवजी गोयल साहेब यांनी शाळेल भेट देऊन जवळपास दोन तास विद्यार्थ्यांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला व शाळेचे व सरांचे कौतुक केले.
या शैक्षणिक कामाबरोबरच सरांनी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यभर लढा उभा केला. सुरूवातिला कृती समिती तयार करुन आंतरजिल्हा बदली धोरण बदलण्यासाठीची वाटचाल सुरू केली. २०१४ मध्ये कृती समिती तयार केली. आंतरजिल्हा बदलीसाठी आंदोलन, निवेदन देत देत २०१६ मध्ये कृती समितीचे रुपांतर संघटनेत करुन शिक्षक सहकार संघटनेची स्थापना केली. लोकमत या वृत्तपत्राच्या माध्यमातून उपसंपादक गजानन दिवान साहेबांच्या मदतीने लेखमालिका लावून आंतरजिल्हा बदलीच्या समस्या शासनापासुन महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहचविल्या. मुंबई, नागपुर येथे प्रत्येक अधिवेशनात लक्षवेधी आंदोलने करुन सरकारचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाले. सरकारने अनेक वेळा संघटनेला आमंत्रित करुन आंतरजिल्हा बदलीचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. सरकारची बरीच चुकिचे धोरणे सरांनी शिक्षक सहकार संघटनेच्या माध्यमातुन हाणुन पाडली. ग्रामविकास विभाग आणि शिक्षक सहकार संघटना यांच्यात अनेक वेळा बैठका झाल्या. आदरणीय असिम गुप्ता साहेबांची ग्रामविकास सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या सोबतच्या सरांच्या पहिल्याच भेटीत खुप सकारात्मक चर्चा झाली. सरांना आंतरजिल्हा आपसी बदल्यांची ३९० बदल्यांची फाईल असिम गुप्ता साहेबांना देऊन एका बदलीसाठी १५ ते २० लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक व्यवहार होऊन बदल्या झाल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले. धोरण बदलेल नाही आणि अशाच बदल्या होत राहिल्या तर पैशेवाल्यांच्याच बदल्या होतील. यासाठी ऑनलाईन बदल्या हा पर्याय अवलंबिण्याची गरज असल्याचे त्यांनी सचिवांना साहेबांना पटवून सांगितले. सचिवांना काही दिवसाचा वेळ मागुन घेतला व सर्व खातरजमा झाल्या नंतर आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन करण्यास तयार झाले. सरांच्याच प्रयत्नांमुळे शिक्षकांच्या बदल्या ह्या आँनलाईपद्धतीने झाल्या. आतापर्यंत २० हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या एक रुपयाही न देता सरांमुळे शक्य झाल्या आहेत.तसेच जिल्हांतर्गत बदल्या देखील ऑनलाईन होण्यामागे सरांचा खुप मोठा वाटा आहे. आजपर्यंत दोनशे कोटीच्या आसपासचा भ्रष्टाचार सरांमुळे वाचलेला आहे. राज्यस्तरावर काम करत करत लातुर जिल्ह्यात देखील अनेक प्रश्न त्यांनी सोडविलेले आहे. विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचे रखडलेले प्रमोशन मार्गी लावलेले आहेत. आपसी आंतरजिल्हा बदल्या बंद करुन हजारो रुपयांचा भ्रष्टाचार वाचविला आहे. संस्थेतील अतिरीक्त शिक्षकांचे समायोजन जि. प. ला होऊ न देता ते संस्थेतच करावयास लावलेले आहेत. शिक्षकांनी सी. एम. पी. वेतन प्रणाली लावण्यासाठीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. तसेच आतापर्यंत ५०० च्यावर आंतरजिल्हा बदल्या लातुर जिल्ह्यात सरांच्या प्रयत्नामुळेच होऊन अनेक भुमिपुत्रांना न्याय मिळवुन दिला आहे. २०१९ साली पुरामुळे मोठे नुकसान झालेल्या सांगली कोल्हापुर करांना मदतीचा हात देत शिक्षक सहकार संघटनेच्या माध्यमातुन सव्वा लाख रुपयांची मदत जमा करुन दिली आहे.
शिक्षकांना आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक सहकार संघटना बचत गटांची निर्मीती करावयास लावली असुन ही बचत गटे शिक्षकांना आर्थिक स्थैर्याबरोबर सामाजिक मदत करण्यास सज्ज झाली आहेत.
२१जुन २०२३ रोजी शिक्षण विभागाने दोन्ही ऑनलाईन बदल्या बंद करण्याचा शासन निर्णय काढुन ऑनलाईन व भ्रष्टाचार मुक्त होणाय्रा बदल्या बंद करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाणे केला आहे. हा जी आर रद्द करण्यासाठी सरांनी ऑनलाईन व ऑफलाईन स्वाक्षरी मोहीम राबवुन अवध्या १० दिवसात १० हजार स्वाक्षऱ्या जमवुन त्यांचे निवेदन माननीय राज्यपाल महोदयांपासुन सर्वांनाच दिले. व २४जुलै २०२३ रोजी त्यांच्याच नेतृत्व खाली आझाद मैदान येथे एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन केले व शिष्टमंडळास मुख्यमंत्र्यांच्या वतीने आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांची भेट घेऊन २१ जुनचा जी आर रद्द करण्याचे आश्वासन घेतले. त्यांच्या कडे पाठपुरावा करुन बंद झालेल्या ऑनलाईन बदल्या सुरू करण्यास शासनाला भाग पाडले. ग्रामविकास विभागाने ऑनलाईन बदल्या न करता बदल्या सीईओ स्तरावर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु सरांच्या प्रयत्नाने ते पत्र रद्द करुन ३० ऑगस्टला पुन्हा आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन करण्याचे पत्र काढले आहे. महाराष्ट्रात मातब्बर संघटना व नेते आसताना कोणत्याही मोठ्या नेत्याने २१ तुमचे पत्र रद्द करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. परंतु संतोष पिट्टलवाड सरांनी शिक्षक सहकार संघटनेच्या माध्यमातुन त्या पत्राला खुप मोठा विरोध ही केला व ते पत्र रद्द करण्याच मार्ग वरच आनले आहे. बंद झालेल्या ऑनलाईन बदल्या शासन पुन्हा चालु करण्यास लावण्याची धमक या नेत्यात आहे. व त्यांनी ती धमक दाखुन दिली आहे.
शिक्षणाच्या प्रवाहात झोकुन दिलेल्या निष्कलंक शिक्षक नेत्याला आजच्या वाढदिवसी खुप खुप शुभेच्छा. इतक्या सर्व गोष्टी यशस्वीपणे पूर्ण करणारा संतोष पिट्टलवाड हा महाराष्ट्रातील एकमेव, अव्दितीय असा यशस्वी नेता आहे.
शब्दांकन
निलेश देशमुख ,राज्य सरचिटणीस, शिक्षक सहकार संघटना
0 Comments