डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची मंगळवेढा काँग्रेस पक्ष कार्यालयास सदिच्छा भेट
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्याचे नेते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे मतदारसंघाचे अध्यक्ष मारुती बाबू वाकडे, पांडुरंग माळी, विष्णुपंत शिंदे, पांडुरंग जावळे, रविकिरण कोळेकर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व युवक काँग्रेसचे पदाधिकारी सर्व काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.
0 Comments