Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा तालुका ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी आनंद शेंडे, उपाध्यक्षपदी संदिप सावंत

 माढा तालुका ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी आनंद शेंडे, उपाध्यक्षपदी संदिप सावंत

कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):-
माढा तालुका ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ या संघटनेची सन २०२३ ते २०२८ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने व घटनेनुसार कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात रविवारी सकाळी अकरा वाजता पार पडली.यावेळी आनंद अरविंद शेंडे यांचा अध्यक्षपदासाठी तर संदीप राजेंद्र सावंत यांचा उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने त्यांची निवड हि बिनविरोध करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नारायण विठ्ठल ढवळे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.पी.कोळी यांनी काम पाहिले. 
 यावेळी सन २०२३-२०२८ या कालावधीसाठी माढा तालुका ग्रामसेवक युनियन डीएनई-१३६ च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाल्यानंतर त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकारणीची निवड जाहीर केली ती पुढील प्रमाणे आहे.सिद्धेश्वर संदिपान माळी (सचिव),मनीषा बबन शेंडेकर(महिला उपाध्यक्ष),तानाजी लक्ष्मण मोहिते (कार्याध्यक्ष),सतीश प्रभाकर भोंग (सहसचिव),हनुमंत आदिनाथ बनाते (संघटक), अनिसा करीम पठाण(महिला संघटक),आप्पासाहेब बब्रुवान शिंदे(कोषाध्यक्ष) अश प्रकारे नूतन कार्यकारणीची बिनविरोध निवड यावेळी करण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक युनियन जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.सदर निवडणूका ह्या माजी अध्यक्ष औदुंबर शिंदे तसेच माजी कार्याध्यक्ष लियाकत शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध करण्यात आल्या आहेत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सज्जन जाधव, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी आर. एस. मोरे,पंढरपूर तालुका अध्यक्ष कैलास कोरके,मोहोळ तालुका सचिव गुंड भाऊसाहेब,मोहोळचे माजी अध्यक्ष एन.आर.माने, तात्या नाईकनवरे,मंगळवेढा तालुका अध्यक्ष गोरख जगताप,शरद जगदाळे,यशवंत कुडळे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातून करमाळा, बार्शी, माळशिरस,मंगळवेढा व माढा या तालुक्यातून बहुसंख्य सभासद व ग्रामसेवक उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments