Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला व मंगळवेढा भागातील साठवण तलाव म्हैसाळ योजनेतून भरून द्या उप मुख्यमंत्री यांच्याकडे मा.आ.प्रशांत परिचारक यांची मागणी

 सांगोला व मंगळवेढा भागातील साठवण तलाव म्हैसाळ योजनेतून भरून द्या

उप मुख्यमंत्री यांच्याकडे मा.आ.प्रशांत परिचारक यांची मागणी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील गावांना टंचाईमधून म्हैसाळ सिंचन योजनेतून साठवण तलाव भरून द्यावेत अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मा.आ.प्रशांत परिचारक यांनी केली.

याबाबत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले असून यामध्ये, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी गावातील साठवण तलाव भरून देण्याची मागणी केली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी अशा भागातील काही गावांना म्हैसाळ सिंचन योजनेतून आर्वतन चालू आहे. तसेच दक्षिणभागातील पडोळकरवाडी, लोणार, भोसे, हुन्नुर, महमंदाबाद हु, रेवेवाडी, मानेवाडी, शिरनांदगी, मारोळी, सलगर बु, लवंगी, भोसे, चिक्कलगी, जंगलगी, पौट, आसबेवाडी, शिवणगी, सोड्डी, येळगी, सलगर खु व सांगोला तालुक्यातील गावामध्ये साठवण तलाव आहेत. परंतु पाऊस कमी असल्याने सदर साठवण तलाव पुर्णपणे कोरडे आहेत. त्यामुळे सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील गावामध्ये पिण्याची पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची अतिशय टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दुर करण्यासाठी सध्या म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन चालू आहे. या आवर्तनामधून सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील साठवण पुर्ण क्षमतेने भरून घेतल्यास शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.

यासाठी सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील साठवण तलाव लवकरात लवकर भरून घेण्याची मागणी केली. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments