माढ्यातील स्व.गणेश काका कुलकर्णी महाविद्यालयात बी.एस्सी शाखा सुरु
माढा (कटूसत्य वृत्त):- बालजागृती विकास मंडळ संचलित माढ्यातील स्व.गणेश काका कुलकर्णी विज्ञान महाविद्यालयात बी.एस्सी विद्याशाखा चालू करण्यासाठी शासनाची व विद्यापिठाची मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेच्या सचिव ज्योतीताई कुलकर्णी यांनी दिली
चालु शैक्षणिक २०२३-२४ या वर्षापासुन महाविद्यालयात बी.एस्सी भाग १ या वर्गाच्या प्रवेश प्रकियेस सुरुवात करण्यात आली आहे.प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना ग्रुप A साठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स तर B ग्रुप करिता केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी व मायक्रोबायोलॉजी हे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत निश्चित करावेत असे आवाहन प्राचार्य अभीमन्यु उकिरडे व अनिस तांबोळी यांनी केले आहे.११ वी १२ वी विज्ञान महाविद्यालयाची १०० टक्के निकालाच्या गुणवत्तेची परंपरा बिएस्सी महाविद्यालयात ही नक्कीच दिसेल.असा विश्वास देखील प्राचार्य उकिरडे यांनी व्यक्त केला.नवीन विद्या शाखेला मंजुरी देण्याकामी शासन व विद्यापीठ प्रशासनाने मोलाचे सहकार्य केल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments