डाॅ.हो.भा.बालवैज्ञानिक स्पर्धेत जि.प.शाळांचे यश
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श कन्या व केंद्र शाळेचे सहा विद्यार्थी परीक्षेत बसण्यास पात्र झाले आहेत. मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या डाॅ.होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेची लेखी परीक्षा 26 नोव्हेंबर 2022 झाली होती. सहावी वर्गातील विज्ञान विषयासाठी होणाऱ्या या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तडवळे शाळेतील २३ विद्यार्थी तर जिल्हा परिषद आदर्श कन्या शाळा शाळेतील ९ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांची औरंगाबाद येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे.यामध्ये केंद्रीय शाळेतील ५ विद्यार्थी सुरज खडके,समर्थ बोगांळे, सार्थक होगले,सुमित जमाले,किशोर सोकांडे व कन्या शाळेतील विद्यार्थीनी गौरी बाहेती यांची 22 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका अंबिका कोळी,विज्ञान पदवीधर शिक्षक गणपती यावलकर, बाळासाहेब जमाले यांचे मार्गदर्शन लाभले.विज्ञान परीक्षेतील या यशाबद्दल विस्ताराधिकारी किशोरी जोशी, केन्द्रप्रमुख जगदीश जाकते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत पवार, अध्यक्षा पूजा देशमाने मुख्याध्यापक केशव पवार सर , जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श कन्या शाळेचे मुख्याध्यापक रहिमान सय्यद,आदर्श शिक्षक जगन्नाथ धायगुडे यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.
0 Comments