Hot Posts

6/recent/ticker-posts

"आनंदश्री प्रतिष्ठानच्या" वतीने 3 सप्टेंबर रोजी हस्ताक्षर सुलेखन स्पर्धा...!

 "आनंदश्री प्रतिष्ठानच्या" वतीने  3 सप्टेंबर रोजी हस्ताक्षर सुलेखन स्पर्धा...! 

अध्यक्षा डॉ.  माधवी रायते यांची माहिती...!! 


सोलापूर( कटू सत्य वृत्त): -विद्यावर्तींच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर दैदीप्यमान यशप्राप्तीसाठी सर्वांग सुंदर हस्ताक्षर आला मानवी जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व असते हे जाणून आनंद श्री प्रतिष्ठानच्या वतीने प्रति वर्ष प्रमाणे यंदाही हस्ताक्षर सुलेखन स्पर्धा रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत ज्ञान प्रबोधनी प्रशाला, डफरीन चौक, सोलापूर या ठिकाणी खुल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती

आनंद श्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.  माधवी रायते यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ.  माधवी रायते पुढे म्हणाल्या की, " गेल्या 17 वर्षापासून सातत्याने आनंद श्री प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद ही मिळत आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये सुलेखन हस्ताक्षराचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून त्या दृष्टीने सुंदर हस्ताक्षराचे वर्ग आयोजन केले जात आहेत. आणि त्याच अनुषंगाने स्वतः मी सुद्धा या हस्ताक्षरामध्ये सहभाग घेऊन दररोज एक पान ज्ञानेश्वरीचे लेखन करून हस्ताक्षराचं महत्त्व कृतीतून साध्य करत आहे. 

विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा  याच विचारधारेतून गेल्या सतरा वर्षांपासून या स्पर्धा अव्यातपणे सुरू असून यंदाही इयत्ता पाचवी ते ज्येष्ठापर्यंतच्या गटासाठी 3 सप्टेंबर रोजी स्पर्धाचे आयोजन केलं असून या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांनी सहभागी होण्यासाठी शाळांना आवाहन पत्रेही देण्यात आली  असल्याचं त्यांनी नमूद केलं. पुढे बोलताना डॉक्टर रायते म्हणाल्या, " या उपक्रमाबरोबरच आदर्श शिक्षकांना सुद्धा आपल्या कामाचं बक्षीस मिळावं या हेतूने या वर्षीचा मातोश्री शिवम्मा गुंडला आदर्श प्राथमिक शिक्षिका पुरस्कार मंजुषा सूर्यकांत कुगावकर या शिक्षिकेला देण्यात येणार आहे. कै.  वि. मो.  मेहता प्राथमिक शाळा,  जुळे सोलापूर  या ठिकाणी मंजुषा कुगावकर आपले ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. 

या स्पर्धा मराठी आणि इंग्रजी या भाषेतून होणार असून शालेय गट ,  महाविद्यालयीन गट, प्रौढ खुला गट असे विभागणी करण्यात आली असून इयत्ता 5वी ते 7वी सकाळी 9 ते 10आणि इयत्ता 8वी ते 10वी  सकाळी 10.30 ते 11.30 तसेच ज्युनिअर व सीनियर कॉलेज आणि प्रौढ खुल्या गटासाठी दुपारी 12 ते  1 अशी वेळ निर्धारित करण्यात आली असून स्पर्धकांसाठी प्रवेश फी नाममात्र दहा रुपये प्रत्येक विषयासाठी आकारण्यात येत आहे. 

स्पर्धकांनी प्रत्येक गटाला दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे आणि विद्यार्थी स्पर्धेला अनुपस्थित राहिल्यास प्रवेश फी परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी असेही यावेळी बोलताना डॉ.  रायते यांनी सांगितलं. 

प्रत्येक भाषेत  (मराठी इंग्लिश) प्रत्येक गटात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकांना अनुक्रमे रुपये 300/-, रुपये 251/-, रुपये 200/-, प्रशस्तीपत्रक आणि पदक प्रदान करण्यात येणार आहे. या शिवाय स्पर्धकांची संख्या 100 पेक्षा अधिक असणाऱ्या प्रत्येकी 25 स्पर्धकांना मागे एक उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 50/- आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. याबरोबरच महाविद्यालयीन प्रौढ खुला गट पारितोषकासाठी किमान 25 स्पर्धक आवश्यक आहेत. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुलेखन स्पर्धेसाठी उतारा तसेच उतारा लेखनासाठी कागद प्रतिष्ठान पुरविणार आहे. पॅड ,निळे किंवा काळे शाईचे पेन,  जेल पेन,  पट्टी ,रबर  इत्यादी साहित्य स्पर्धकांनी आणावे. स्पर्धेतील निकाल प्रतिष्ठानच्या परीक्षकाच्या निर्णयानुसार अंतिम असेल.  कोणालाही हस्तक्षेप करता येणार नसल्याचं यावेळी  बोलताना डॉ.   रायते यांनी सांगितलं. 

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता लेखिका तथा म.सा.प. च्या अध्यक्षा डॉ.  श्रुती वडगबाळकर यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित केलेला आहे. 

तरी प्रशालेतील आणि महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर सुलेखन स्पर्धेत सहभागी व्हावे आणि स्पर्धा यशस्वी करण्यास सहयोग द्यावा असे आवाहन आनंद श्री प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.  माधवी रायते यांनी केलंआहे. 

या पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष जयंत रायते, महादेवी उडचण, प्रदीप बेलुरे, सुषमा रायते, डॉ.  नीरज रायते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments