जिल्हा परिषद पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बळीराम सर्वगोड
सरचिटणीस पदी सचिन जाधव तर खजिनदारपदी संदीप येरवडे यांची बिनविरोध निवड

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषद बीट पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बळीराम सर्वगोड यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीस पदी सचिन जाधव तर खजिनदारपदी संदीप येरवडे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद बीट पत्रकारांची सर्वसाधारण बैठक बुधवारी झेडपीच्या शिवरत्न सभागृह येथे मावळते अध्यक्ष संगमेश जेऊरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अकराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची निवड झाल्याबद्दल व राज्यांच्या अधिस्वीकृती समितीवर प्रमोद बोडके यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष पदासाठी बळीराम सर्वगोड व सरचिटणीस पदासाठी सचिन जाधव हे दोन नावे आल्याने सर्वानुमते ही निवड बिनविरोध करण्यात आली. तर खजिनदार पदी संदीप येरवडे यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीप्रसंगी शरीफ सय्यद, शेखर गोतसुर्वे, राजकुमार सारोळे, शितलकुमार कांबळे, अमोल साळुंखे, गौतम गायकवाड, रविकांत बगले, मनोज भालेराव, इम्रान सगरी, संदीप गायकवाड, दिपक शेळके आदी उपस्थित होते.
0 Comments