संवेदनशील नेता कसा असावा याचा आदर्श वस्तू पाठ म्हणजेच किसन जाधव:- प्रदीप गारटकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सो.म.पा.चे माजी गटनेते किसन जाधव यांचा वाढदिवस मोठ्या थाटांत साजरा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रचंड ध्येयवाद अविरत कष्ट करण्याची तयारी सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव आव्हानांना तोंड देण्याचे वृत्ती यामुळे अल्पावधीत सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसान जाधव यांनी जनमानसात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. संवेदनशील नेता कसा असावा याचा आदर्श वस्तू पाठ जाधव यांनी सोलापूरकरांना घालून दिला. कोणताही प्रसंग निर्माण झाला तरी त्यावर मात करून पुढे जायचे असते. संकटे कायमच येत राहतात मात्र संकटांना न घाबरता आपण ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे हा मूलमंत्र जपत आजवर किसन जाधव यांनी अविरत कार्य सुरू ठेवले कुठल्याही कामांचा निश्चय केल्यानंतर ते त्यात झोकून काम करणे हा किसन जाधव यांचा गुण आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून प्रभागाचा विकास साधला. विकासासाठी कुठलेही राजकारण न करता सर्वाधिक निधी खेचून आणण्यात ते यशस्वी झाले. जाधव यांनी शून्यातून विश्व उभे केले हे त्यांचे कतृत्व आहे. दुर्बल,वंचित, बहुजन समाजाला राष्ट्रवादी पक्षाशी जोडण्यात आणि पक्षाशी बांधून ठेवण्यात किसन जाधव यांनी बजावलेल्या भूमिकेने पक्षाची ताकद आणखीन वाढली आहे. प्रभागाचा विकास हाच एकच ध्यास हे मनी धरून सर्वाधिक निधी शासन स्तरावरून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास त्यांनी साधला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कुशीत तयार झालेले खंबीर नेतृत्व म्हणजेच किसन जाधव असल्याचे मनोगत राष्ट्रवादीचे नेते तथा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आयोजित किसन जाधव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केलं. दरम्यान सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती किसन जाधव म्हणाले की जनतेच्या आशीर्वादाने आजपर्यंत आपण अविरत काम करत आहे. या भागातील मतदार राजांनी आम्हाला तीन टर्म सेवा करण्याची संधी दिली या पुढील काळात देखील अशीच संधी जनसेवेसाठी द्यावी तसेच अजित दादांच्या आशीर्वादाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते.राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा विराजमान व्हावे यासाठी किशन जाधव यांनी चक्क व्यासपीठावरून दंडवत घालत जनतेची व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते किसन जाधव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रभाग क्रमांक 22 येथे इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब आणि किसन जाधव मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पुणे राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने, उद्योजक कुमार करजगी, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे चिरंजीव यशराज साळुंखे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे, इरफान शेख, प्रसाद लोंढे, रॉकी बंगाळे, टकारी समाज युवक संघटना अध्यक्ष विनोद जाधव, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक तौफिक शेख,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता रोटे, सौ अश्विनी चव्हाण, माजी नगरसेविका सौ श्रीदेवी फुलारे, मेनका ताई सरकार, शशिकला कस्पटे, रुक्मिणी जाधव,माजी नगरसेवक नागेश गायकवाड, चेतन गायकवाड, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जाधव, ईच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य आदींची उपस्थिती होती. दरम्यान किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी महापौर महेश कोठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, मनोहरपंत सपाटे, यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळींनी भ्रमणध्वनीद्वारे किसन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आयोजित कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण मोठ्या थाटात करण्यात आला. दरम्यान आयोजित कबड्डी स्पर्धेतील स्वराज्य स्पोर्ट्स क्लब ने विजेतेपद पटकविल्याने संघास वीस हजार 63 रुपये रोख आणि चषक प्रथम पारितोषक देण्यात आले तर उपविजेता संघ पटकाविलेल्या अंजुमन क्रीडा संघास पंधरा हजार 63 रुपये आणि अजित दादा चषक आणि तृतीय क्रमांक पटकाविलेल्या श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लब यास दहा हजार 63 रुपये आणि अजित दादा चषक प्रदान करण्यात आले. महिलांच्या गटात एकता स्पोर्ट्स क्लब आणि कुमारी स्पोर्ट्स क्लब यांच्यात सामना झाला या सामन्यांमध्ये एकता स्पोर्ट्स क्लब ने विजेतेपद पटकावले तर खूप येते ते पण रुक्मिणी स्पोर्ट्स करणे पटकाविला. या संघात सात हजार 63 रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेचे पंचप्रमुख म्हणून संतोष जाधव यांनी विशेष भूमिका बजावली तर या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाही मदन गायकवाड निरीक्षक म्हणून मरगु जाधव, एल एस जाधव, मोहन जाधव, शिवाजी गायकवाड, अंबादास गायकवाड,प्रकाश जाधव यांनी काम पाहिले. मोठ्या खेळीमेळी वातावरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेची सांगता करण्यात आली. दरम्यान सत्कार सोहळ्याप्रसंगी एकच वादा अजित दादा अशा घोषणाने अवघा परिसर राष्ट्रवादीमय झाले होते तर प्रदीप गारटकर, यशराज साळुंखे यांचा आगमन होताच येथील स्थानिक रहिवाशांनी फटाके फोडत, ढोल ताशाच्या गजरात, राष्ट्रवादी पुन्हा या गाण्याच्या निनादात जंगी स्वागत केले.
0 Comments