Hot Posts

6/recent/ticker-posts

दहावीच्या विद्यार्थ्यांचा कृतज्ञता मेळावा;अठरा वर्षांनी एकत्र आले वाफळेच्या श्री जगदंबा विद्यालयाचे माजी विद्यार्थी

 दहावीच्या विद्यार्थ्यांचा कृतज्ञता मेळावा

अठरा वर्षांनी एकत्र आले वाफळेच्या श्री जगदंबा विद्यालयाचे माजी विद्यार्थी

अनगर (कटूसत्य वृत्त):- वाफळे येथील श्री जगदंबा  विद्यालय 2005ची बॅच अठरा वर्षांनी मित्र-मैत्रिणी शनिवारी एकत्र आल्याने पुन्हा ते आपल्या भाव विश्वात रममाण झाले.

2005 सालच्या दहावी बॅचमधील विद्यार्थ्यांचा हा कृतज्ञता मेळावा होता. मेळाव्यासाठी मुख्याध्यापक विश्वजीत देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर संजय दाढे हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

हा स्नेह मेळावा सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शाळेतील आठवणींना उजाळा देत शाळा आणि शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या स्नेहमेळाव्यासाठी   विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वजीत देशमुख, माजी शिक्षक संजय दाढे , अभिमन्यू मोरे, शिवाजी शेळके , यशवंत गोरे, आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्नेह मेळाव्यात सर्वांनी मनोगते व्यक्त करीत, स्वतःचा परिचय करून दिला. काहींनी गायन करत कार्यक्रमात रंगत आणली, तर काहींनी खट्याळ-गोड  गुरु-शिष्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सर्व शिक्षकांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. १८ वर्षानंतर होणाऱ्या या स्नेह मेळाव्यासाठी बहुतांश माजी विद्यार्थी उपस्थित होते. स्नेह मेळाव्यात सर्वांचे सोबत स्नेहभोजन झाले. सागर दाढे, अनिल चव्हाण, बापूराव झोडे, नाना माने, डॉ.कविता सपकाळ, सारिका वाघमारे,बाई चव्हाण यांच्यासह सर्वांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत गोरे यांनी केले व आभार प्रदर्शन  सागर दाढे यांनी केले. शाळेच्या ऋणात राहून शाळेसाठी मदत  करण्याचे आश्वासन देत या स्नेहमेळाव्याची सांगता झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments