Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थी हिताला प्राधान्य देणार- सुर्यकांत पाटील

 विद्यार्थी हिताला प्राधान्य देणार- सुर्यकांत पाटील

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- समाजातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन विद्यार्थी हितासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील,असे मत मराठा सेवा संघाचे नुतन शहराध्यक्ष सुर्यकांत पाटील यांनी व्यक्त केले.

   डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने मराठा सेवा संघाचे नुतन शहराध्यक्ष सुर्यकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी संघटनेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण,जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे,शहराध्यक्ष अनिल गायकवाड,दिपक डांगे,अतुल नारकर,आदी उपस्थित होते.समाजामध्ये सुशिक्षित बेकारांची संख्या दिवसेदिवस वाढत असुन त्यांच्यासाठी जाॅब फेअर,दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर यासारखे विविध उपक्रम मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन राबविण्याचा मानस आसल्याचे मत सुर्यकांत पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी संतोष माशाळे, विशाल पवार,धनाजी मोरे,भाऊसाहेब मोरे,श्रीराम जाधव,निलेश पवार,नारायण पवार,इलियास शेख,बरगली लांडगे,महेश केवटे,संतोष रजपुत,समीर शेख आदी उपस्थित होते.





Reactions

Post a Comment

0 Comments