Hot Posts

6/recent/ticker-posts

निमगाव येथे 30 मे रोजी आंबा कार्यशाळा

 निमगाव येथे 30 मे रोजी आंबा कार्यशाळा

माळशिरस (कटूसत्य वृत्त):- निमगाव ता. माळशिरस येथे मंगळवार दि 30 मे रोजी सकाळी 9.00 वाजता निमगाव-पिलीव रोड नजीक आंबा बागायतदार निनाद पाटील यांच्या शेतावर महादेश फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेडचे चेअरमन सचिन नलावडे, बी टेक, एमबीए हे सघन आंबा लागवड व वर्षभर घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन "आंबा बागायतदार" सोशल मीडिया ग्रुप निमगावच्या वतीने करण्यात आले आहे


   फळांचा राजा म्हणून आंब्याला संबोधलं जातं पश्चिम महाराष्ट्रातील केशर आंबा हा जगभर प्रसिद्ध असून नुकताच आंब्याचा काढणी हंगाम संपत आला आहे किंवा काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आहे निमगाव ता माळशिरस येथील व आसपासच्या परिसरातील आंबा लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले असून निमगाव व आसपासच्या परिसरात जवळपास एक हजार एकर आंब्याचे क्षेत्र असून दिवसेंदिवस नवीन लागवड वाढत चालली आहे याचबरोबर नव्यानेच लागवड केलेल्या आंबा उत्पादकांच्या अडचणी व शेतकऱ्यांना आंबा फळ पिकाचे  काढणीनंतर वर्षभर व्यवस्थापन कसे करावयाचे ? आंब्याला देण्यात येणारे कल्टर ॲप्लीकेशन कशा पद्धतीने करावयाचे ? दरवर्षी आंबा काढणीनंतर आंबा बागेची छाटणी करावयाची का? करावयाची असेल तर ती कोणत्या पद्धतीने करावयाची ? याचे प्रात्यक्षिक, आंब्याला वर्षभर कराव्या लागणाऱ्या फवारण्या, देण्यात येणारी खते ,कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावयाचे यावर सखोल असे मार्गदर्शन उस्मानाबाद येथील सचिन नलावडे करणार आहेत तरी या कार्यशाळेत सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांना या मोफत कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी 705 751 40 45 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करणे आवश्यक आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments