Hot Posts

6/recent/ticker-posts

शासन आपल्या दारी अंतर्गत बार्शी तालुक्यात महाशिबिरात साडेआठ हजारहून अधिक दाखले वाटप

 शासन आपल्या दारी अंतर्गत बार्शी तालुक्यात महाशिबिरात साडेआठ हजारहून अधिक दाखले वाटप

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय, बार्शीच्या वतीने आयोजित महाशिबिरात 8 हजार 694 दाखले वाटप करण्यात आले. तहसीलदार अंजली मरोड यांनी ही माहिती दिली.


            तहसीलदार अंजली मरोड म्हणाल्या, जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आणि उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्या मार्गदर्शनखाली दि. 22 ते 26 मे या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर महाशिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महसूलसह कृषि, पशुसंवर्धन, उद्योग, आरोग्य, कामगार, महिला व बालविकास अशा अनेक विभागांनी सक्रिय सहभाग घेतला. या महाशिबिरास आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या हस्ते लाभार्थींना दाखले, प्रमाणपत्र, लाभ वाटप करण्यात आले.


            या महाशिबिरात दिलेला लाभ दिलेली संख्या पुढीलप्रमाणे – सीमांत शेतकरी गट बांधणी – प्रती गाव एक – गट नोंदणी प्रमाणपत्र एकूण लाभार्थी – 30, महाडीबीटी – कृषि अभियांत्रिकीकरण योजना एकूण पूर्व संमती लाभार्थी  - 667, ई – श्रम कार्ड – 435, सर्व निधी योजना – 600, इमारत बांधकाम योजना – 16, रेशनकार्ड –442, संजय गांधी व श्रावणबाळ योजना  - 292, ज्येष्ठ नागरिक कार्ड – 53, जात प्रमाणपत्र – 74, रहिवासी, उत्पन्न,जन्म, मृत्यू इ.दाखले – 3449, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना – 14, बचतगट (15000 रूपये लाभ) – 225, गायी, म्हशी व शेळी, मेंढी वाटप – 17, महिलांना शिलाई मशीन  वाटप – 30, इतर योजना (विधवा, अपंग, दारिद्र्य रेषेखालील) – 291, वीज जोडणी, माती परीक्षण – 15, दिव्यांग साहित्य वाटप – 60, डिजीटल इंडिया अंतर्गत शासनाच्या डिजीटल सुविधांची माहिती व प्रशिक्षण – 11, शेतकरी ते ग्राहक थेट बाजारपेठ – 23, नवमतदार नोंदणी – 251, मुलींना सायकल वाटप – 38, मनरेगा (जि. प. व कृषि विभाग) – 200, घरकुल योजना (पं. स. ,न.पा ,म. न. पा.)  – 340, पी. एम. एफ. एम. इ. (P.M. Formalization of Microfood  Enterprises – 31, नोंदणी – 39, पी. एम. किसान माहिती दुरूस्ती – 432, आधार कार्ड, पॅन कार्ड, पास पोर्ट – 87, शासकीय कर्मचारी आस्थापना विषयक प्रलंबित बाबी व निवृत्ती विषयक लाभ – 4, सेवा केंद्राचे परवाने – 29, इतर योजनांचे लाभार्थी 307.

Reactions

Post a Comment

0 Comments