शासन आपल्या दारी अंतर्गत मोहोळ तालुक्यात साडेचार हजार जणांना लाभ वाटप
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय, मोहोळच्या वतीने आयोजित महाशिबिरात जवळपास 4 हजार 537 लाभार्थीना वेगवेगळे लाभ देण्यात आले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी ही माहिती दिली.
तहसीलदार प्रशांत बेडसे म्हणाले, जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आणि उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनखाली दि. २२ ते २९ मे या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर महाशिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महसूलसह कृषि, गट विकास अधिकारी, पशुसंवर्धन, उद्योग, आरोग्य, कामगार, महिला व बालविकास अशा अनेक विभागांनी सक्रिय सहभाग घेतला. या महाशिबिरास आमदार यशवंत माने यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या हस्ते लाभार्थींना दाखले, प्रमाणपत्र, लाभ वाटप करण्यात आले.
या महाशिबिरात दिलेला लाभ दिलेली संख्या पुढीलप्रमाणे –
पाणंद रस्ते खुले करणे - 20
जातीचे दाखले - 460
रहिवासी दाखले - 662
उत्पन्न दाखले - 2280
नॉन क्रिमी लेयर दाखले -153
प्रधानमंत्री किसान सन्मान - 181
संजय गांधी योजना - 164
इतर विभाग – 637
0 Comments